Talathi commits suicide due to family dispute : बहिणीला सांगितले, ‘पाच दिवसांपासून उपाशी आहे’
Akola ‘पत्नी मुलांसमोर अश्लील शिव्या देते, फाशी घेण्यास वारंवार प्रवृत्त करते. भावाला व्याजाने पैसे दिले, पण परत मिळाले नाहीत. मृत्यूनंतर पत्नीला माझा चेहरा दाखवू नका,’ असे व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवून तलाठ्याने रविवारी (३० मार्च) सायंकाळी गळफास घेत आत्महत्या केली. सोमवारी (३१ मार्च) अंत्यसंस्कारानंतर हा प्रकार उघडकीस आला.
शिलानंद माणिकराव तेलगोटे (३९, रा. शाहूनगर, गाडेगाव रोड, तेल्हारा) असे मृत तलाठ्याचे नाव आहे. ते अकोट महसूल विभागात कार्यरत होते आणि ई-फेरफारमध्ये उत्कृष्ट तलाठी म्हणून त्यांना गौरवण्यात आले होते. ३० मार्च रोजी सकाळी त्यांनी बहिणीशी संवाद साधला, त्यावेळी ‘मी पाच दिवसांपासून उपाशी आहे’ असे सांगितले. संध्याकाळी आईला भेटून ‘१० मिनिटांत परत येतो’ असे सांगून निघून गेले. त्यानंतर त्यांचा मृतदेह तेल्हारा एमआयडीसी परिसरातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून तपास सुरू आहे.
Assistant Commissioner : ‘तो’ प्रस्ताव पुन्हा सहाय्यक आयुक्तांकडे!
“मी, शिलानंद माणिकराव तेलगोटे (वय ३९), राहणार तेल्हारा, शाहूनगर, गाडेगाव रोड. आज (३० मार्च २०२५) आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूला जबाबदार माझी पत्नी प्रतिभा तेलगोटे आहे. ती मला मुलांसमोर अपमानित करते आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त करते. मी तिच्या भावाला शेतीसाठी व्याजाने पैसे दिले, पण तो पैसे परत करत नाही. त्यामुळे माझ्या पगारातून कटोती सुरू आहे. मृत्यूनंतर माझे पोस्टमार्टम करू नका आणि माझा चेहरा पत्नीला दाखवू नका. मी गेल्या पाच दिवसांपासून उपाशी आहे,” असं स्टेटस त्यांनी ठेवलं होतं.
पोलिसांनी शिलानंद यांचा मोबाईल ताब्यात घेतला आहे. त्यावर पत्नीच्या छळाचा उल्लेख असलेले स्टेटस आढळले. ३१ मार्च रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी पत्नीही उपस्थित होती. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेत तपास सुरू केला आहे.
“ते दारूच्या आहारी गेले होते. दारू पिऊन धमक्या द्यायचे. आत्महत्या करतो, तक्रार करतो असे वारंवार म्हणायचे. आम्ही घाबरायचो. पैशाच्या व्यवहाराची मला माहिती नाही. त्यांनी माझी बदनामी केली आहे,’ असा प्रतिवाद मृताची पत्नी प्रतिभा तेलगोटे यांनी केला आहे.