Crime in Amravati : किती हे भयंकर? वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मायलेकाचा खून

Amravati shaken by double murder : दुहेरी हत्याकांडाने हादरला अशोकनगर परिसर

Amravati  तिवसा येथील अशोकनगर परिसर दुहेरी हत्याकांडाने हादरला. वडिलांच्या मारेकऱ्याचा सूड उगविण्यासाठी रोहन सुधाकर अवझाड (२१) याने अमोल डाखोरे (४०) आणि त्यांची आई सुशीलाबाई डाखोरे (६५) यांचा खून केला. या घटनेनंतर आरोपीने स्वतःहून पोलिस ठाण्यात हजेरी लावून आत्मसमर्पण केले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डाखोरे व अवझाड कुटुंबामध्ये गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू होता. २७ मार्च २०२४ रोजी अमोल डाखोरे यांनी रोहनचे वडील सुधाकर अवझाड यांचा शेतात कुऱ्हाडीने वार करून खून केला होता. या प्रकरणात अमोलला अटक झाली होती. मात्र, अलीकडेच तो जामिनावर सुटला. यामुळे सूडाच्या भावनेने पेटलेल्या रोहनने बुधवारी सकाळी डाखोरे यांच्या घरासमोर जाऊन शिवीगाळ केली.

Zilla Parishad : धक्कादायक! जि. प. स्थापनेपासून १८ गटांमध्ये ‘एससी’ आरक्षणच नाही

शिवीगाळ ऐकून बाहेर आलेल्या अमोलवर रोहनने चाकूने वार करून त्याला ठार केले. मुलाला वाचविण्यासाठी पुढे आलेल्या सुशीलाबाई यांच्या गळ्यावरही त्याने चाकूने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Raut on Bhujbal : तेव्हा तुम्ही शिवसेना सोडली, आता मंत्रिमंडळ सोडणार का?

या घटनेनंतर रोहन अवझाडने चाकूसह थेट तिवसा पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. दरम्यान, अमोल डाखोरे यांच्या पत्नी मंगला डाखोरे यांनी तिवसा पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानुसार आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल पवार यांनी पाहणी केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक गोपाल उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.