Crime in Buldhana : पोलिसांनी काढली ‘रावण’ची धिंड!

The police paraded the criminal through the streets : पानटपरी चालकास मारहाण करणाऱ्या आरोपीला चोप

Buldhana चिखली शहरात क्षुल्लक कारणावरून पानटपरी चालक आणि त्याच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी भर चौकात चोप दिला. त्यानंतर पोलिस ठाण्यापर्यंत धिंड काढली. या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये पोलिसांच्या या कठोर भूमिकेची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे इतर गुन्हेगारांनीही या घटनेमुळे धसका घेतला आहे.

जयस्तंभ चौकात गोरक्षणवाडीतील रावण व त्याचा भाऊ बबलू यांनी अशोक माटे या पानटपरी चालकावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात माटे यांचा मुलगाही जखमी झाला. घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला.

Accident in Buldhana : प्रवाशांनी भरलेली एसटी दुभाजकावर आदळली!

याआधीही रावण याने शहरात अशाच प्रकारे दहशत माजवण्याचे प्रकार केले होते. त्याच्या विरोधात याआधीही गुन्हे दाखल असून, त्याच्या वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे पोलिसांनी कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. ठाणेदार संग्राम पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरोपीची जयस्तंभ चौकातून पोलिस ठाण्यापर्यंत धिंड काढण्यात आली. विशेष म्हणजे, याआधीही पोलिसांनी ‘रावण’ची धिंड काढली होती, मात्र त्याने गुन्हेगारीचा मार्ग सोडला नाही.

आरोपींनी त्यांच्याकडे एका व्यक्तीचा फोन नंबर मागितलाय. तसेच त्यांच्या फोनवरून संबंधित व्यक्तीस कॉल करण्यास सांगितले. मात्र, माटे यांनी नकार दिल्याने आरोपींनी संतप्त होऊन त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यांच्यावर काचेच्या बाटलीनेही वार करण्यात आला. वडिलांना वाचवण्यास गेलेल्या माटे यांच्या मुलालाही आरोपींनी बेदम मारहाण केली.

CM Devendra Fadnavis: राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘उमेद मॉल’!

दरम्यान, या प्रकरणात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्याने माटे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी यापुढेही कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला आहे. चिखली पाेलिसांनी गुंडगिरी करणाऱ्यांवर केलेल्या करवाईमुळे सर्वसामान्यांनी काैतुक केले आहे. तसेच पाेलिसांनी गुंडांवर वचक ठेवण्यासाठी अशीच भूमिका घेण्याची गरज असल्याचे अनेकांनी स्पष्ट केले.