Breaking

Crime in Nagpur : मी रामदास आठवलेंचा भाचा आहे, ३० लाखात एमबीबीएसला प्रवेश देतो!

Embezzled Rs 18 lakhs by claiming to be a relative of Ramdas Athawale : सेवानिवृत्त सैनिकाला १८ लाखांचा गंडा; बायकोवरही गुन्हा दाखल

Nagpur मंत्री, आमदारांचे नातेवाईक असल्याचे सांगून सर्वसामान्य लोकांकडून पैसा लुबाडण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. यात अनेक सुशिक्षित कुटुंब देखील आहेत. नागपुरात तर बेलतरोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका सेवानिवृत्त सैनिकालाच १८ लाखांनी गंडा घातल्याची घटना पुढे आली आहे. लुबाडणाऱ्याने आपण केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा नातेवाईक असल्याचे सांगितले, हे विशेष.

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांचा भाचा असल्याची बतावणी करत मंत्रालयामार्फत एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली एका ठकबाजाने पालकाला १८ लाखांचा गंडा घातला. मोहन व्यंकट खोब्रागडे (५०, भारतनगर, वडधामना) असे तक्रारदाराचे नाव आहे. तर, निखील विश्वनाथ कांबळे (वय ४०, फार्च्युन अपार्टमेंट, मनिषनगर) व त्याची पत्नी शीतल कांबळे, अशी आरोपींची नावे आहेत.

Rashtriya Swayamsevak Sangh : संघाची दिल्लीत बैठक, भाजपचा अध्यक्ष ठरणार?

मोहन खोब्रागडे सेवानिवृत्त सैनिक असून, ते वायरलेस विभागात २०१२ पासून कार्यरत आहेत. त्यांच्या मुलीला २०२२ मध्ये एमबीबीएस करायचे होते. मात्र, गुण कमी पडल्याने त्यांनी तिला रशियात पाठविण्याचा निर्णय घेतला. त्या कालावधीत त्यांची भेट आरोपी निखीलसोबत झाली. त्याने मुलीला रशियाला का पाठविता, मी रामदास आठवले यांचा भाचा असून केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून नागपुरातील लता मंगेशकर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश करवून देतो, असा दावा केला.

त्याबदल्यात ३० लाख रुपये लागतील, असे तो म्हणाला. अखेर २७ लाखांत सौदा ठरला. ऑक्टोबर २०२२ मध्ये खोब्रागडे यांनी निखीलच्या घरी जाऊन १५ लाख रोख व मुलीची कागदपत्रे दिली. सिक्युरिटी म्हणून निखीलने खोब्रागडे यांना कोरा धनादेशदेखील दिला. काही दिवसांनी खोब्रागडे यांच्या घरी एक फोन आला व प्रवेशाचे काम झाले आहे, तुम्ही निखीलशी संपर्क साधा, असे समोरील व्यक्तीने सांगितले.

Abu Azmi : अबू आझमींच्या वक्तव्यावर विहिंपचा आक्रमक

निखीलच्या सांगण्यावरून खोब्रागडे यांनी ३.१३ लाख त्याच्या खात्यात वळते केले. मात्र, त्यानंतर प्रवेश झालाच नाही. उशीर झाल्याने २०२३ च्या सत्रात प्रवेश होईल, असे आरोपीने त्यांना सांगितले. मात्र, प्रवेश झालाच नाही व आरोपी दाम्पत्य घर सोडून पसार झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खोब्रागडे यांनी तक्रार केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.