A minor stole eight lakh rupees from own house : चोरलेले पैसे मित्रांमध्ये वाटून दिले; मैत्रिणीला मोबाईल घेऊन दिला
Gondia एका अल्पवयीन मुलाने गेल्या वर्षभरात स्वतःच्याच काकांच्या घरातून आठ लाख रुपये चोरले. तो टप्प्याटप्प्याने पैसे चोरत होता आणि आपल्या मित्रांमध्ये वाटत होता. कुणाला मदत केली तर कुणाला उधार दिले. काही उधार परतही आले. एवढेच नव्हे तर त्याने मैत्रिणीला मोबाईलही घेऊन दिला. सोळावं वरीस धोक्याचं म्हणतात, त्याची प्रचिती देणारी ही घटना आहे.
आमगाव पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम बनगाव येथे हा प्रकार घडला आहे. या घटनेने संपूर्ण गोंदियाच नव्हे तर महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. चोरी करणारा अल्पवयीन आहे. त्याने २० मार्च २०२४ ते ८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ही रक्कम चोरली आहे. या मुलाने आपल्या मोठ्या वडिलांचा मुलगा पंकज सूर्यकुमार गजभिये (४०) याच्या घरातून जवळपास वर्षभरात आठ लाख रुपये चोरले आहेत.
Uday Samant : केजरीवालांनी लोकशाहीचा सन्मान केला, पण राऊतांनी..
या चोरलेल्या पैशांतील तीन लाख २३ हजार रुपये त्याने भजेपार (सालेकसा) येथील दोन मित्रांना दिले. त्यानंतर येथल्याच एका मित्राला तीन लाख २१ हजार रुपये, तर दुसऱ्याला दोन हजार रुपये दिले होते. आमगाव शहरातील विद्यानगरीमध्ये राहणाऱ्या मित्राला ६६ हजार रुपये दिले होते. त्यातील ५५ हजार रुपये त्याने त्याला परतही केले. ग्राम बनगाव येथील एका मित्राला १४ हजार ५०० रुपये व दुसऱ्याला एक हजार रुपये दिले होते.
बाम्हणी येथील १७ वर्षीय मुलाला तीन हजार रुपये दिले. तर अंजोरा येथील एका मित्राला दोन हजार रुपये दिले होते. जवरी गावातील एका १६ वर्षीय मुलाला ३०० रुपये दिल्याचेही त्याने कबुल केले आहे. चोरी केलेले ७० हजार रुपये तो गेममध्ये हारला होता. याप्रकरणी पंकज गजभिये याच्या तक्रारीवरून आमगाव पोलिसांनी या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे.
Nagpur Municipal Corporation : अर्थसंकल्पात लागणार योजनांना कात्री !
मैत्रिणीवर आणि स्वतःवर केला खर्च
त्याने आपल्या मैत्रिणीला मोबाइल दुरुस्तीसाठी दोन हजार ५०० रुपये दिले. तीन हजार रुपयांचा मोबाइल तिला विकत घेऊन दिला होता. उर्वरीत तीन लाख ६९ हजार ७०० रुपये त्याने स्वत: खर्च केले. कमाई नसताना मोबाइलसारख्या महागड्या वस्तू विकत घेणे. मित्रांना घेऊन देणे. या प्रकारामुळे त्याच्यावर संशय आला होता. कसून चौकशी झाल्यावर त्याने चोरीची कबुली दिली.