Breaking

Crime in Gondia : 63 लाख रुपयांचा चुना लावून आरोपी मजा मारण्यासाठी थायलंडला!

 

Accused robbed of 63 lakh rupees and went to Thailand : 10 टक्के व्याजाचे आमिष देऊन मायलेकाला लुटले

Gondia स्टॉक व फॉरेक्स मार्केटिंगचा ऑनलाईन व्यापार करण्यासाठी पैसे दिल्यास १० टक्के व्याज मिळेल. असे आमीष देऊन रामनगर परिसरातील मायलेकाला तब्बल ६३ लाख रुपयांनी चुना लावण्यात आला. या घटनेसंदर्भात कुंभारटोली परिसरातील तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पैसे घेऊन मजा मारण्यासाठी थायलंडला पसार झाला आहे.

शहरातील रामनगर परिसरातील दीनदयाल वाॅर्डातील मनोहर कॉलनी येथील सुनंदा महेंद्र रामटेके (वय ४८) या महिलेने शहर पोलिसांत केलेल्या तक्रारीनुसार, कुंभारटोली परिसरातील आरोपी अंकुश पृथ्वीराज कांबळे (२८) हा सुनंदा यांच्या मुलासोबत शिकला आहे. त्यामुळे त्याच्यासोबत त्यांंची जुनी ओळख आहे. १० ऑगस्ट २०२४ रोजी भाग्यवान शहारे हा अंकुश कांबळे याला घेऊन सुनंदा यांच्या घरी गेला होता.

POCSO case : तक्रार तर घेतली नाही, पैसे मात्र घेतले!

 

अंकुशचे श्रीजी कॉम्प्लेक्स येथे कार्यालय असून आपल्या मोबाईलवर मी रोज १५ लाखांपर्यंतचा व्यवहार करतो, असे सांगितले. अंकुशने मी लोकांना १० टक्के व्याजाप्रमाणे पैसे परत देतो, तुम्ही मार्केटिंगमध्ये पैसे टाका, तुम्हालासुद्धा १० टक्क्यांनी पैसे परत करेन असे आमिष दिले. अंकुश व भाग्यवान यांच्यावर विश्वास ठेवून सुनंदा यांनी ३७ लाख,त्याचा मुलगा अनिकेत याने १८ लाख तर मुलगी प्रेरणा हिच्याकडून ८ लाख असे ६३ लाख रूपये दिले. ती रक्कम घेऊन अंकुशने त्यांची फसवणूक केली.

आरोपींवर सोमवारी (दि.२४) शहर पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक संजय तुपे करत आहेत.

Vidarbha Farmers : ६५% पीक नष्ट! ‘डेटसुकी’ रोगामुळे संत्रा उत्पादक संकटात!

सुनंदा रामटेके यांनी अंकुश याला प्रथम ५० हजार रूपये दिले, त्यानंतर ‘अंकुश’च्या सांगण्यावरून त्याच्या अंकुश ट्रेडिंग नावाच्या खात्यात १३ ऑक्टोबर २०२४ रोजी पाच लाख रुपये, ४ सप्टेंबर २०२४ रोजी पाच लाख, १८ ऑक्टोबर २०२४ रोजी चार लाख, १९ ऑक्टोबर २०२४ रोजी पाच लाख, ८ नोव्हेंबर रोजी तीन लाख, ७ जानेवारी २०२५ रोजी तीन लाख रुपये असे एकूण २५ लाख आरटीजीएसद्वारे तर १७ ऑगस्ट २०२४ रोजी एक लाख, ११ ऑक्टोबर २०२४ रोजी एक लाख, दोन लाख नेफ्टद्वारे, नऊ लाख ५० हजार रुपये वेगवेगळ्या तारखेस रोख दिले असे एकूण ३७ लाख रूपये त्याला दिले. मुलगी प्रेरणा महेंद्र रामटेके हिच्याकडून दोन लाख आरटीजीएसद्वारे व सहा लाख रुपये रोख असे एकूण आठ लाख रुपये घेतले.

Accident in Nagpur : आईने छातीशी कवटाळले, पण बाळाचा मृत्यू झाला होता !

तर मुलगा अनिकेत याच्याकडून १३ लाख आरटीजीएसद्वारे व पाच लाख रोख असे एकूण १८ लाख रुपये घेतले. रकमेवरील व्याज देण्याची वेळ आली तेव्हा सुनंदा रामटेके यांनी ५ जानेवारी २०२५ रोजी अंकुशला फोन केला तर ‘अंकुश’ने सध्या कॅश नाही, ऑनलाईन पेमेंट करतो असे सांगितले. परंतु, खात्यावर पैसे टाकले नाही म्हणून मुलगा अनिकेत व जावई मिळून अंकुश कांबळे याच्या घरी गेले तेव्हा तो घरी नव्हता. त्याच्या आईला अंकुश संदर्भात विचारल्यावर तो थायलंडला गेला आहे.

तो परत येऊन सर्वांचे पैसे परत देईल असे त्याच्या आईने सांगितले. बरेच दिवस होऊनसुद्धा अंकुश परत आला नाही.