Murder because of a post on Instagram : हिंगणघाटमधील घटनेने हादरले लोक
Wardha इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केल्याच्या वादातून दोन भावंडांनी १७ वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून खून केला. ही घटना हिंगणघाट तालुक्यातील पिंपळगाव (माथनकर) येथील बारामती ले आउट परिसरात शनिवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली.
हिमांशू किशोर चिमणे (१७ संत कबीर वार्ड हिंगणघाट) असे मृत मुलाचे नाव आहे. या प्रकरणी दाखल तक्रारी वरून मानव धनराज जुगनाके (२१) व अनिकेत धनराज जुगनाके (२३) यांना हिंगणघाट पोलीसांनी ताब्यात घेतले.
दीड महिन्यापूर्वी इंस्टाग्रामवर हिमांशु आणि मानव याने स्टोरी पोस्ट केली होती. यात एकाच्या पोस्टला अधिक लाईक्स आणि कमेंट मिळाले. तर दुसऱ्याच्या पोस्टला कमी लाईक्स मीळाले होते. यावरून दोघांत चांगलाच वाद झाला होता. प्रकरण हाणामारीवर आले होते. हा वाद मिटत नाही तोच पुन्हा हिमांशु ने सोशल मीडियावर ‘बाप तो बाप रहेगा’ अशी पोस्ट केली होती.
यावरून हिमांशु आणि मानव यात पुन्हा वाद झाला. वाद वाढू नये यासाठी हिमांशु मानवच्या घरी समझोता करण्यासाठी गेला होता. दरम्यान याच्यात शाब्दिक चकमक झाली. संतापलेल्या हिमांशुने मानवला चापट मारली. वाद वाढू नये यासाठी मानवचा भाऊ अनिकेत हा मध्यस्थी करण्यासाठी धावून गेला. यात हिमांशुने जवळ असलेला धारदार शस्त्र काढून मानवर हल्ला चढविला. यात स्वत:चा बचाव करीत त्याच चाकूने मानव व अनिकेत याने हिमांशुच्या मानेवर छातीवर सपासप वार करून रक्ताच्या थारोळ्यात पाडले. यात त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले आहे.
या वादाचे पर्यवसान म्हणून काल रात्री मृतक हिमांशू यास जीव गमवावा लागला.मागील दिड महिन्यापूर्वी इंस्टाग्रामवरती टाकलेल्या पोस्टवरुन या युवकांमध्ये वाद सुरु होता, या वादाचे पर्यवसान म्हणून काल रात्री मृतक हिमांशू यास जीव गमवावा लागला. मृतकासोबत झालेल्या झटापटीत आरोपी अनिकेत जुगनाके हा सुध्दा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून स्थिती गंभीर असल्याने त्याला वर्धा येथे रेफर करण्यात आले आहे.
Maharashtra Government : समृद्धी महामार्गावर एकाच रात्री तीन अपघात!
या घटनेपुर्वी झालेल्या वादात आरोपीं युवकांनी मृतक हिमांशुच्या घरी जाऊन वाद केला होता. यावेळी एकमेकांना मारहाण केली होती. मागील दीड महिन्यापूर्वी इंस्टाग्रामवरती टाकलेल्या पोस्टवरुन हा वाद सुरु होता. या वादाने रात्री हिंसक वळण घेतल्याने युवकाला जीव गमवावा लागला.