Crime in Maravati : पहिले कारने उडवले, नंतर शस्त्राने भोसकून पोलिसाचा निर्घृण खून

Brutal murder of ASI by stabbing, after hitting with car : पोलिस दलात खळबळ; पूर्वीच्या वादाची पार्श्वभूमी, नियोजनबद्ध रेकी उघड

Amravati वलगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक उपनिरीक्षक अब्दुल कलाम अब्दुल कदीर (वय ५६) यांचा शनिवारी सायंकाळी नवसारी टी पॉईंट ते चांगापूर फाटा दरम्यान कारने उडवून, चाकूने भोसकून निर्घृण खून करण्यात आला. या थरारक हत्येमुळे अमरावती पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. हल्लेखोरांनी कलाम यांच्यावर १२ पेक्षा अधिक वेळा धारदार शस्त्राने हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कलाम हे नेहमीप्रमाणे शनिवारी सायंकाळी मोपेडने वलगाव ठाण्याकडे निघाले होते. नवसारी टी पॉईंटजवळ आरोपी कारसह रेकी करत उभे होते. त्यांनी भरधाव वेगाने कलाम यांच्या मोपेडला पाठीमागून अनेकदा धडक दिली. त्यामुळे ते जमिनीवर कोसळले आणि त्यानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला.

Hindi Marathi Conspiracy : मनसेकडूनही जय्यत तयारी, लोकलमधून सुरू केला प्रचार !

प्रथमदर्शनी ही घटना अपघात असल्याचा संशय व्यक्त झाला. सहकाऱ्याला अपघात झाल्याचे समजताच पोलिसांनी कलाम यांना जवळच्याच खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांच्या अंगावर असलेल्या चाकूचे खोल घाव पाहून हा अपघात नसून, सरळसरळ खून असल्याचे स्पष्ट केले.

यानंतर कलाम यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवागारात हलवण्यात आला. तेथे पोलिस आयुक्त अरविंद चावरिया, उपायुक्त सागर पाटील, गणेश शिंदे, सहाय्यक आयुक्त अरुण पाटील, जयदत्त भंवर, तसेच विविध पोलिस ठाण्यांचे अधिकारी उपस्थित होते.

Criem News: शॉकिंग! ग्राहकांची बिले नगरपालिकेच्या नावावर टाकत गंडा

२१ जून रोजी एहसानउद्दीन सिराजउद्दीन यांच्या तक्रारीवरून कलाम यांचे भाऊ अब्दुल सलाम आणि अन्य दोन जणांविरुद्ध नागपुरी गेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पैशांच्या व्यवहारातून झालेला वाद हेच या हत्येचे कारण असल्याचे पोलिसांचे प्राथमिक अनुमान आहे.