Breaking

Crime in Nagpur : शिवी दिली म्हणून अल्पवयीन मुलाचा प्राणघातक हल्ला!

 

Assault committed by a minor : थोडक्यात जीव वाचला; पानठेल्यावर झाला होता किरकोळ वाद

Nagpur गुन्हेगारी वृत्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढणे हे समाजासाठी धोकादायक ठरत आहे. आक्रमकता, विकृती याचे प्रमाण अल्पवयीन मुलांमध्ये जास्त आहे. त्याची प्रचिती देणारी आणखी घटना नागपूरला घडली. शिवी दिली म्हणून एका अल्पवयीन मुलाने थेट त्या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला. कुऱ्हाडीने वार केले. या घटनेमुळे परिसरातील रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सिगारेट ओढण्यावरून झालेल्या किरकोळ वादात शिवीगाळ झाला. अशात संतप्त झालेल्या एका अल्पवयीन मुलाने त्याच्या मित्रांच्या मदतीने प्रॉपर्टी डीलरवर प्राणघातक हल्ला केला. पारडीच्या भांडेवाडीत सकाळी ही घटना घडली.

Nagpur Improvement Trust : उपराजधानीत वारकरी भवनाच्या कामाला गती

विजय उर्फ विजू भांडेकर (५०, भांडेवाडी) असे जखमी प्रॉपर्टी डीलरचे नाव आहे. पोलिसांनी वाठोडा येथील एक अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या साथीदारांना अटक केली आहे. १६ वर्षीय आरोपी दोन मित्रांसह पारडी येथील लाल शाळेजवळील पानठेल्यावर उभा होता. भांडेकरही तिथे आले. भांडेकरचा अल्पवयीन मुलाशी आणि त्याच्या मित्रांशी सिगारेट ओढण्यावरून वाद झाला.

भांडेकर त्याला शिवीगाळ करू लागले. भांडेकर परिसरातील रहिवासी असल्याने अल्पवयीन मुलगा तेथून निघून गेला. मात्र त्याने भांडेकरांवर हल्ला करण्याचा कट रचला. सकाळ होताच, अल्पवयीन मुलाने घरातून कुऱ्हाड घेतली व त्याच्या दोन्ही मित्रांना फोन केला. सकाळी ९.३० वाजता भांडेकर त्यांच्या मोटारसायकलवरून बाहेर जाण्यास निघाले. ते मोटारसायकलवर बसताच अल्पवयीन मुलाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना खाली पाडून कुऱ्हाडीने वार करण्यात आले.

Amravati Congress: काँग्रेस Confident, महापालिका निवडणूक जिंकणारच!

त्यांचा आवाज ऐकून वस्तीतील लोकांनी धाव घेतली. आरोपी तेथून फरार झाले. भांडेकर यांना इस्पितळात नेण्यात आले. पारडी पोलीस ठाण्यातील पथकदेखील घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता त्यात अल्पवयीन मुलगा दिसला. त्याला ताब्यात घेतल्यावर त्याने हल्ला केल्याची कबुली दिली. सर्वांसमोर भांडेकर यांनी शिवीगाळ केल्याने अपमानित झाल्यामुळेच हल्ला केल्याचे त्याने सांगितले.