Women beat up the man who tried to rape a minor girl : अल्पवयीन मुलीसाठी धावून आल्या वस्तीतील महिला
Nagpur शेजारी राहत असलेल्या एका युवकाने अल्पवयीन मुलीला घरात नेऊन तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. मुलीच्या शोधात आई शेजाऱ्याच्या घरी गेल्यानंतर मोठा अनर्थ टळला आणि हा घृणास्पद प्रकार उघडकीस आला. वस्तीतील महिलांनी आरोपी युवकाला चोप दिला. त्यानंतर पराडी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांंनी गुन्हा दाखल करुन आरोपीला ताब्यात घेतले.
पारडी हद्दीत राहणारी चार वर्षीय मुलगी ही तिच्या आई-वडिलांसोबत राहते. वडिल बांधकाम मजुरीचे काम करतात. आरोपी युवक हा आरामशीनवर वडिल आणि भावासह काम करतो. पीडित मुलगी आणि आरोपी एकाच परिसरात राहतात. त्यामुळे दोन्ही कुटुंबातील संबंध चांगले होते. सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास आरोपी युवक आणि पीडित मुलगी दोघेही क्रिकेट खेळत होते.
Anti Corruption Bureau : महिला सरपंचाला ३६ हजारांची लाच घेताना अटक
यावेळी, मुलीवर त्या युवकाची वाईट नजर गेली. तिला त्याने घरी नेले आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होता. दुसरीकडे मुलगी घराबाहेर दिसत नसल्याने आईची वस्तीत शोधाशोध सुरू होती. एका शेजारी महिलेने मुलगी आरोपी युवकासोबत घरी जाताना दिसल्याचे सांगितले. आई त्याच्या घरी पोहोचली असता समोरचे दृष्य बघून तिच्या पायाखालीची वाळूच सरकली.
तिने आरडाओरड केल्याने नागरिकही जमा झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. तत्काळ पोलिसही घटनास्थळी पोहोचते झाले. येथूनच पोलिसांनी आरोपी युवकाला ताब्यात घेतले.
Crime in Nagpur : शिवी दिली म्हणून अल्पवयीन मुलाचा प्राणघातक हल्ला!
सजगतेचा आदर्श
अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या घटना सातत्याने घडतात. असे विकृत गुन्हेगार आपल्या आसपासच असतात. पण लोक जागरुक नसतात म्हणून गुन्हेगारांची हिंमत वाढत असते. या घटनेने मात्र सजगतेचा आदर्श समाजात निर्माण केला आहे. कुणीतरी संकटात असताना धावून जाणे आणि मदतीसाठी पुढाकार घेणे ही बाब जागरुक नागरिकाचे लक्षण आहे. याची प्रचिती देणारी ही घटना आहे.