Breaking

Crime in Wardha : जळालेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह

A woman’s body was found in a burnt condition : पोलिसांना घातपाताचा संशय; आर्वीतील टोना भागातील घटना

Wardha आर्वी तालुक्यातील टोना येथे जळालेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळून आला. ही घटना शनिवारी सकाळी ७:०० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

सुहास रमेश काळबांडे (५०, रा. दत्त वाॅर्ड, आर्वी, ह.मु. टोना, ता. आर्वी) असे मृत महिलेचे नाव आहे. महिलेचा मृतदेह जाळून घातपात केल्याची शंका कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी तत्काळ तपास करण्याची मागणी संतप्त परिवाराने केली. मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. यावेळी रुग्णालय परिसरात नातेवाइकांनी मोठी गर्दी केली होती.

Students from socially and economically backward classes : विद्यार्थ्यांसाठी Good News! जातवैधता प्रमाणपत्रासाठी मुदतवाढ

मृत महिला मागील १८ ते २० वर्षांपासून टोना येथे कामानिमित्त वास्तव्याला होती. तिचा मुलगा प्रफुल्ल रमेश काळबांडे (३०) अधूनमधून तिला भेटायला टोना येथे जात होता. मुलगा प्रफुल्ल याला पोलिस पाटील सचिन बनसोड यांनी फोनवरून त्याची आई मरण पावल्याचे सांगितले. त्यावरून प्रफुल्लने तातडीने नातेवाइकांना फोन करून माहिती दिली व घटनास्थळ गाठले.

ही घटना गावातील शाळेजवळच्या परिसरात उघडकीस आली. मुलगा प्रफुल्ल शनिवारी घटनास्थळी गेला. त्याने पाहणी केली असता जळालेल्या अवस्थेत आईचा मृतदेह आढळला. एवढी मोठी घटना घडूनही गावातील लोक काही सांगण्यास तयार नव्हते. मृतदेह धरायला किंवा मदत करायला एकही ग्रामस्थ पुढे आला नाही. मुलगा गेला तेव्हा झाड पेटले होते, त्यातून धूर निघत होता, असे प्रफुल्ल यांनी सांगितले.

Nitin Gadkari : गडकरी म्हणाले, Timepass करणाऱ्यांना सस्पेंड करा !

शुक्रवारी रात्री थंडीमुळे शेकोटी पेटविली. त्यातच महिला जळाली, अशी गावात चर्चा होती. परंतु मुलाने प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर तसे दिसून आले नाही. त्यामुळे हा घातपात आहे, असा आरोप मुलगा प्रफुल्ल काळपांडे व नातेवाइकांनी केला आहे. दरम्यान, पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात नेला. तेथे शवविच्छेदन होणार नसल्याने आणि फॉरेन्सिक लॅबसाठी पाठवायचा असल्याने मृतदेह वर्धा सामान्य रुग्णालयात दुपारी अडीच वाजता पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली.