Breaking

Crime in Wardha : रशियातील विद्यापीठात प्रवेश करून देतो म्हणून उकळले पैसे!

Fraud on the name of admission to a university in Russia : बनावट प्रवेशपत्राच्या प्रकरणात गुजरातच्या आरोपींविरुद्ध गुन्हा

Wardha रशियातील क्रासनोयार्क विद्यापीठात मुलाचा प्रवेश करून देण्याच्या नावावर बनावट प्रवेश प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याची ३ लाख ८३ हजार ५०० रुपयांनी फसवणूक करण्यात आली. ही घटना वर्ध्यात उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. शुभम गवारले रा. उमरी मेघे हे जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा देत आहेत. त्यांच्या काकाचा मुलगा हर्षल राऊत याला एमबीबीएसला रशिया येथील विद्यापीठात प्रवेश घ्यायचा होता. डॉ. गवारले यांचेही शिक्षण विदेशातून झाल्याने त्यांच्या काकाने त्यांना मुलाच्या प्रवेशाबाबत विचारणा करत विदेशात प्रवेश मिळवून देणारे कुणी आहे का, याबाबत विचारणा केली.

Chandrashekhar Bawankule : व्याघ्र प्रकल्पाशेजारील गावांना Protection!

त्यानंतर डॉ. शुभम गवारले यांनी चौकशी केली असता, गुजरात येथील यागनिक पटेल याची माहिती दिली. त्याने यापूर्वी अनेकांचे प्रवेश विदेशात करून दिल्याचीही माहिती त्यांनी दिली. मात्र, त्याने बनावट प्रवेशपत्र देऊन कुठलाही प्रवेश विद्यापीठात न करता मनोज राऊत यांचा मुलगा हर्षल राऊत यांच्याकडून ३ लाख ८३ हजार ५०० रुपये घेऊन फसवणूक केली.

ठकबाज यागनिक पटेल याचे गुजरात येथे ऑफीस असल्याची माहिती होती. तसेच, त्याने यापूर्वी अनेकांची ॲडमिशन केली असल्याचेही समजले होते. त्यानुसार त्याचा संपर्क क्रमांक मिळवून विचारणा केली असता, रशिया येथील क्रासनोयार्क विद्यापीठात मी कॉर्डिनेटर असून, तुमची ॲडमिशन होऊन जाईल, ४० मुलांचा ग्रुप चालला असून, तुमच्या विद्यार्थ्याची ॲडमीशन करण्यासाठी २७ लाख रुपये खर्च येईल, असे सांगितले.

Devendra Fadanvis : केंद्र शासनाकडून वित्त पुरवठा व्याजदर कमी असावेत!

डॉ. गरवारले यांनी ही बाब त्यांचे काका मनोज राऊत यांना सांगितली होती. त्यांच्यातही संवाद झाला होता. त्याप्रमाणे वारंवार पिंपळखुटा येथील बँकेतून, तसेच फोनपेद्वारा ३ लाख ८३ हजार ५०० रुपये पाठविले होते. फसवणूक झालेल्या विद्यार्थ्याच्या पालकांनी रशिया विद्यापीठात विचारपूस केली असता, तेथील एका विद्यार्थ्याने विद्यापीठात पैसे भरले नसल्याने पटेल यांच्याकडून ॲडमिशन घेणे बंद केल्याचे समजले. डॉ. गवारले यांनी विद्यापीठाशी ई-मेलद्वारे संपर्क केला असता, विद्यापीठाने तुमच्याकडील प्रवेशपत्र खोटे आहे, असे सांगण्यात आले होते.