Breaking

Crime in Wardha पतीने कानशिलात लगावली; संतप्त पत्नीची चिमुकलीसह आत्महत्या

The husband slapped wife, commits suicide with toddler : फुकटा गावातील घटनेने खळबळ; विहिरीतून काढले मृतदेह

Wardha शेतात चरत असलेल्या मेंढ्यांना परत आण, असे म्हणत पतीने विवाहितेला मारहाण केली. याच रागातून संतप्त विवाहितेने पोटच्या दीड वर्षाच्या चिमुकलीला सोबत घेत शेतातीलच विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. ही घटना हिंगणघाट तालुक्यातील फुकटा गावात घडली. या प्रकरणी वडनेर पोलिसांनी नोंद घेतली. शशिकला पिंटू घुले (२४ रा. परसोडी, जि. यवतमाळ), कविता पिंटू घुले (१.५) अशी मृतांची नावे आहेत.

घुले कुटुंब मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील आहे. ते फुकटा गावात मेंढ्या चरण्यासाठी घेऊन आले होते. त्यांचा मेंढ्या सांभाळण्याचा व्यवसाय आहे. मेंढ्या चारून आणल्यानंतर त्यांना जाळीत कोंडणे होते. मात्र, मेंढ्या शेजारच्या शेतातील पिकाकडे गेल्याने पिंटूने गुरुवारी पत्नी शशिकलाला मेंढ्यांना आणण्यास सांगितले. मात्र, शशिकलाने जाण्यास नकार दिला. त्यावेळी पिंटूने पत्नीच्या कानशिलात लगावत मेंढ्या आणण्यास सांगितले. शशिकला रागाच्या भरात तिच्या मुलीसह मेंढ्या आणायला गेली. मात्र, तिने पतीच्या रागाने वरघणे यांच्या शेतात असलेल्या विहिरीत मुलीसह उडी मारून आत्महत्या केली.

Sanjay Rathod : भावी पिढीची जुळेल मातीशी नाळ!

विहिरीत उडी मारताना तेथील काही नागरिकांनी ही गोष्ट पाहिली. त्यांनी तत्काळ इतरांना गोळा केले. मायलेकीचा मृतदेह विहिरीबाहेर काढले. मृत विवाहितेच्या घरातील नातेवाईकही घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी कुठलीही तक्रार नसल्याचे सांगितले. दोघांच्याही मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.