Woman searching for hidden treasure hatches robbery plot : मारेगावातून अटक; किराणा व्यावसायिकाचे घर लुटले
Yavatmal दारव्हा शहरातील किराणा व्यावसायिकाच्या घरी भर दुपारी दरोडा टाकून ४२ लाखांचा ऐवज लुटण्यात आला. यात थेट नांदेडच्या सराईत गुन्हेगाराचा वापर झाला. पोलिसांनी दरोडा पडताच संपूर्ण मुद्देमालासह सहा आरोपींना अटक केली. मात्र, हा दरोडा टाकण्याचा कट कोणी रचला याचा शोध घेत असताना धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
गुप्तधन शोधणाऱ्या महिलेने याचा कट रचून दुपारी भरदिवसा दरोडा टाकला. एलसीपी पथकाने त्या महिलेला मारेगाव येथून शनिवारी रात्री अटक केली. मंदा अशोक पासवान (वाघमारे, ४५), रा. मारेगाव, असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला गुप्तधन शोधणाऱ्या टोळीचे नेतृत्व करते. तिने अनेक ठिकाणी गुप्तधनाचा शोध घेतला आहे.
दरोडा प्रकरणात किराणा व्यावसायिक गणेश काळबांडे यांच्या घरातील संपूर्ण माहिती देणाऱ्या रवींद्र पोकळे याला दारव्हा पोलिसांनी अटक केल्यानंतर दरोड्याचा कट कोणी रचला हे उघड झाले.
दरोडेखोरांची टोळी शेतातून पळत असताना शेंबाळपिंपरी येथे पाठलाग करून पकडले होते. मास्टर माइंड मंदा पासवान, टिप देणारा रवींद्र पोकळे व दरोडेखोरांच्या टोळीतील सहा सदस्य, अशी आठ आरोपींना पोलिसांनी सबळ पुरव्यानिशी अटक केली आहे. इतर दोघे अजूनही पसार आहे.
यात गुप्तधन शोधणाऱ्या मंदा पासवान हिचा मुख्य सहभाग असल्याचे उघड झाले. मंदाने रवींद्रच्या माध्यमातून व्यावसायिक गणेश काळबांडे यांच्या घरातील लाइव्ह लोकेशन मिळवले. त्यानंतर स्वतः रेकी करून संपूर्ण घराची व परिसरातील रस्त्याची पाहणी केली. यावेळी एक व्यक्ती तिच्या सोबत होता. त्यानंतर नांदेड येथील दरोडेखोरांच्या टोळीला बोलाविण्यात आले. त्यांनी दारव्हा शहरात एकत्र येऊन दरोडा टाकण्याचे नियोजन केले.
Electricity bill Overdue : वीज वितरण कंपनीची ग्रामपंचायतींना नोटीस!
ज्यावेळी दरोडा पडला, तेव्हा मंदा पासवान ही एमएच ३५ एजी ४४३५ क्रमांकाची कार घेऊन त्याच परिसरात फिरत होती. दरोडा यशस्वी झाल्यानंतर ती तेथून निघून गेली. दरम्यान, पोलिसांचा पाठलाग सुरू झाल्याने मंदाने मार्ग बदलल्याचे तपासातून पुढे आले आहे.