Breaking

Crime increased in Amravati : खून, चोऱ्या वाढल्या; गुंडगिरीवर लगाम राहिला नाही!

Youth Congress alleges that the police are not controlling crime : अमरावतीतील वाढत्या गुन्हेगारीविरोधात युवक काँग्रेस आक्रमक

Amravati राज्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेत रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आलेला असतानाच शहरात खून, चोऱ्या आणि गुंडगिरीच्या घटना वाढल्याच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसने बुधवारी पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांची भेट घेऊन शहरातील कायदा व सुव्यवस्था सुधारण्यासाठी तातडीची पावले उचलण्याची मागणी केली.

आयुक्तांना भेटण्यापूर्वी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी “मंत्रीच खेळतात रमी, तेथे कायदा-सुव्यवस्थेची काय हमी?” अशा घोषणा देत आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यांच्या मते, गेल्या महिन्याभरात अमरावती शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. एमडी ड्रग्ज, गांजा आणि चायना चाकूंची खुलेआम विक्री सुरू असून, अवैध जुगार अड्ड्यांची संख्याही वाढली आहे.

Pranjal Khewalkar’s : प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमधून उघड झाला ‘ नंगानाच ’ !

अवैध धंद्यांमुळे शहरातील सामाजिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, अनेक बार आणि पबमध्ये मध्यरात्रीपर्यंत पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी अल्पवयीन मुलांना मद्य विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व प्रकारांवर कडक कारवाई होणे गरजेचे असल्याचे युवक काँग्रेसने आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.

शहरात पोलिस दलाचे अस्तित्व जाणवत नसल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्या झाल्या आहेत. त्यामुळे गुन्हेगारांचे मनोधैर्य इतके वाढले आहे की, ते आता पोलिसांनाही लक्ष्य करत आहेत. यामुळे पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवरच यापूर्वी खासदार बळवंतराव वानखडे, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वात एका प्रतिनिधीमंडळानेही पोलिस आयुक्तांची भेट घेऊन शहरातील वाढत्या गुन्हेगारीसंदर्भात वस्तुस्थिती मांडली होती. तसेच, विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार संजय खोडके यांनीही हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला होता.

Dharmapal Meshram : आदिवासी फासेपारधींच्या वस्त्यांमध्ये दाखले वाटप करण्यासाठी शिबीरे घ्या !

यावेळी युवक काँग्रेसचे पदाधिकारी समीर जवंजाळ, वैभव देशमुख, सागर कलाने, अनिकेत ढेंगळे, आशिष यादव, संकेत साहू, मोहीत भेंडे, धनंजय बोबडे, कौस्तुभ देशमुख, संकेत भेंडे, शुभम बांबल, कृणाल गावंडे, पियुष अभ्यंकर, चैतन्य गायकवाड, श्रेयस धर्माळे, वेदांत केने, अमेय देशमुख, आकाश गेडाम, कुणाल जोध आदी कार्यकर्ते उपस्थित होते.