Crime news : अकोल्यात ठाकरे गटाच्या शहरप्रमुखावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न!

akola-crime-attempt-to-murder-on-thackeray-group-city-chief-yavatmal-wife-murder-case : यवतमाळमध्ये कौटुंबिक वादातून पत्नीची निर्घृण हत्या

Akola / Yavatmal : अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या घटनांनी विदर्भातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. अकोला शहरात ठाकरे गटाच्या शहरप्रमुखावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून यवतमाळमध्ये कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची गंभीर घटना घडली आहे.

अकोला शहरातील मोठी उमरी परिसरात ठाकरे गटाचे शहरप्रमुख राहुल कराळे यांच्या वाहनावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार, कराळे हे आपल्या घराजवळ उभ्या असलेल्या बोलेरो वाहनात बसत असताना तिघेजण अचानक तेथे आले. त्यांच्या हातात तलवार आणि लोखंडी पाईप असल्याचे सांगितले जात आहे. संबंधितांनी वाहनाच्या काचा फोडत दहशत माजवली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याची माहिती असून फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरू करण्यात आला आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. आमदार नितीन देशमुख यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत कायदा सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले असल्याचे समजते. पोलिसांकडून तपासाची गती वाढविण्यात आली असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Neelam gorhe : कधी कधी ठरवून सभागृह तहकूब करतो; विधानभवनातील गदारोळावर पडदा उघड

दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातील वडकी पोलीस ठाणे हद्दीतील बोरी इचोड येथे कौटुंबिक वादातून पत्नीची निर्घृण हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. वैजयंतीमाला श्रीनिवास येलके असे मृत महिलेचे नाव असून श्रीनिवास येलके असे आरोपी पतीचे नाव आहे. पती-पत्नीमध्ये घरगुती कारणांवरून नेहमी वाद होत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. घटनेच्या दिवशी दोघेही आपल्या शेतात तुरी ठोकण्यासाठी गेले होते. यावेळी जुन्या वादातून संतप्त झालेल्या पतीने कुऱ्हाडीने पत्नीच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. गुन्हा लपविण्याच्या उद्देशाने आरोपीने मृतदेह शेतातील तुरीच्या गंजीत लपवून तेथून पळ काढला. मात्र पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवून आरोपीला अटक केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास वडकी पोलीस करत आहेत.

Asia economic dialogue : मोफत योजनांना पाच वर्षे ब्रेक द्या, उद्योगांना करमाफी द्या!

अकोल्यातील राजकीय पार्श्वभूमीवर झालेला हल्ला आणि यवतमाळमधील कौटुंबिक हिंसाचाराची घटना या दोन्ही प्रकरणांनी कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा चर्चेत आणला आहे. दोन्ही घटनांमध्ये पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.