Corporators bodybuilder son caught red handed selling drugs : बड्या नगरसेवकाच्या ‘बॉडी बिल्डर’ मुलाला ड्रग्ज विकताना रंगेहात पकडले
Nagpur : नागपुरातील माजी नगरसेवकाच्या मुलाला एमडी ड्रगची तस्करी करताना अटक करण्यात आली आहे. माजी नगरसेवक अजय बुग्गेवार यांचा बॉडी बिल्डर असलेला मुलगा संकेत बुग्गेवार याला एमडी ड्रग तस्करी करताना गणेशपेठ पोलिसांनी अटक केली. या धडक कारवाईत पोलिसांना त्याच्याजवळ 16.07 ग्राम एमडी पावडर सापडली. या कारवाईत 1.67 लाख रुपयाच्या एमडी पावडरसह 18.17 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संकेत हा माजी नगरसेवकांचा मुलगा असून तो बॉडी बिल्डर आणि जिम ट्रेनर आहे. तो नागपूरचे माजी नगरसेवक अजय बुग्गेवार यांचा मुलगा आहे. त्याने नोव्हेंबर 2022 मध्ये दिल्ली येथे बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक आणि मिस्टर इंडिया टायटल देखील जिंकले होते. दरम्यान या ड्रग्ज विक्री प्रकरणात माजी नगरसेवकाच्या लेकाचे नाव आल्याने तसेच त्याला अटक करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
MNS UBT alliance : मनसे-शिवसेना ठाकरे गटाच्या युतीचा ‘सस्पेन्स’ कायम !
समोर आलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी संकेतला अटक केली तेव्हा तो एमडी या अमली पदार्थाची डिलिव्हरी देण्यासाठी जात असल्याचा आरोप आहे. संकेत हा गणेशपेठ येथील मध्यवर्ती बसस्थानका समोरील हेडाऊ रेस्टॉरंटजवळ येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. याच माहितीच्या आधारे गणेशपेठ पोलिसांनी शनिवारी रात्रीपासूनच सापळा रचला. अशातच संकेत आपल्या एमएच 45 एव्ही 4554 कारने जाधव चौकात पोहोचला. पोलिसांनी त्याला अडविले व त्याची तसेच कारची झडती घेतली असता त्याच्या खिशात 16.07 ग्राम एमडी पावडर आढळली.
Buldhana Dhad Grampanchayat : धाड ग्रामपंचायतमध्ये अनियमितता; माजी सरपंचांचा आरोप
या ड्रग पावडरची किंमत सुमारे 1.67 लाख रुपये आहे. यावेळी पोलिसांनी एमडी पावडरसह 18.17 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे, सध्या पोलीस त्याची चौकशी करून काही कनेक्शन बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. नागपूर शहरास ‘ड्रग्स फ्री’करण्याच्या उद्देशाने नागपूर पोलिसांकडून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे. पोलिस आयुक्त रविंद्र सिंगल यांच्या संकल्पनेतून प्रेरित ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत आणि 26 जून आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अनेक मोठ्या कारवाई करत मोहीम हाती घेतली आहे.