Crime News : नर्तकीच्या प्रेमात माजी उपसरपंचाचे अतर्क्यपाऊल

He was shot in the head with a pistol in front of his house : ‘ति’च्या घरासमोरच डोक्याला पिस्तूल लावून ओढला चाप

Solapur / beed : प्रेमप्रकरणातून उद्भवलेल्या तणावाने गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे वय 34 यांनी आयुष्याचा शेवट केला. बार्शी तालुक्यातील सासुर गावात नर्तकीच्या घरासमोर कारमध्ये बसून त्यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

गोविंद बर्गे हे थापडीतांडा येथील कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाडच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. दीड वर्षांच्या ओळखीवरून प्रेमसंबंध जुळले आणि तिला त्यांनी सोन्याचे दागिने, महागडे मोबाईल यांसह मोठ्या प्रमाणात भेटवस्तू दिल्या. मात्र अलीकडेच पूजा गायकवाडने त्यांच्याशी बोलणे बंद केले. एवढेच नव्हे तर बंगला व शेती आपल्या नावावर करण्याचा दबाव टाकत न मानल्यास बलात्कार प्रकरणात गुंतविण्याची धमकीही दिल्याचे समोर आले आहे.

PWD : बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना ठाकरे गटाचा घेराव

 

या सगळ्यामुळे मानसिक तणावात सापडलेले गोविंद सोमवारी रात्री तिच्या घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या घराजवळच कारमध्ये बसलेल्या अवस्थेत त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतल्याचे आढळले. पोलिसांनी कारचा दरवाजा उघडला असता ड्रायव्हिंग सीटवर मृतदेह सापडला. घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी झाली.

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवारांच्या समर्थनार्थ रोहित पवार उभे ठाकले

या घटनेनंतर गोविंद बर्गे यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, नववीत शिकणारी मुलगी आणि सहावीत शिकणारा मुलगा असा परिवार आहे. दरम्यान, या प्रकरणी मृताच्या मेहुण्याच्या तक्रारीवरून 21 वर्षीय पूजा गायकवाड हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आत्महत्या आणि घातपाताची शक्यता गृहित धरून तपास सुरू केला आहे.