Crime news : प्रेमविवाहाचा राग, तरुणाची नग्न करून गावभर धिंड, लोखंडी रॉडने बेदम मारहाण

jalgaon-bhusawal-crime-love-marriage-violence-youth-assault-case-news : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात अमानुष प्रकार;पाच जणांना अटक

Bhusaval: जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात प्रेमविवाहाच्या वादातून अत्यंत धक्कादायक आणि अमानुष घटना उघडकीस आली असून मुलीच्या नातेवाईकांनी तरुणाला नग्न करून बेदम मारहाण करत गावभर धिंड काढल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत दहा ते बारा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली आहे.

भुसावळ तालुक्यातील खडका गावातील चेतन दिलीप जंगले या तरुणाने आपल्या समाजातीलच धनश्री पाटील या तरुणीसोबत नाशिक येथे जाऊन प्रेमविवाह केला. मात्र हा विवाह मुलीच्या कुटुंबीयांना मान्य नव्हता. विवाहानंतर चेतन जंगले आपल्या पत्नीसह नातेवाईकांकडे आला असल्याची माहिती मिळताच मुलीच्या नातेवाईकांनी संतापाच्या भरात त्याच्यावर हल्ला चढवला.

Iran israel conflict : मध्यपूर्वेत तणावाची पराकाष्ठा; इराणकडून इस्त्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ले

घटनेच्या दिवशी संशयितांनी तरुणाच्या मामाच्या घरी जाऊन प्रथम तरुणीला मारहाण करत तिला जबरदस्तीने सोबत नेले. त्यानंतर त्यांनी चेतन जंगले याला पकडून खांबाला बांधले आणि त्याला विवस्त्र करत लोखंडी रॉड व दगडांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्याला दुचाकीवरून गावात नेऊन त्याची धिंड काढली. या दरम्यान त्याच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे लक्षात येताच गावातील काही नागरिकांनी मध्यस्थी करत त्याची सुटका केली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

या मारहाणीमध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून त्याचा हात फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्याच्यावर जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संशयितांनी या घटनेदरम्यान तरुणाच्या आई-वडिलांनाही घर जाळण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.

Ashok kharat case : नाशिक भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात एसआयटीची ७ तास चौकशी

या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिस पुढील तपास करत असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.