Breaking

Crime news : ‘ मै वापस आऊंगा…’ म्हणत नराधमाने तिच्यासोबत काढली सेल्फी

The act of a courier boy, a horrific incident of rape : कुरियर बॉय म्हणून आलेल्याचे कृत्य, बलात्काराची भयानक घटना

Pune : पुण्यातील कोंढवा भागातील पॉश सोसायटीत राहणाऱ्या तरूणीवर बलात्कार झाला. आरोपी कुरिअर बॉयच्या वेशात सोसायटीत घुसला. नराधमाने पीडितेच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून तिच्यावर अत्याचार केला. सोबत सेल्फी काढून “मी परत येईन” असा धमकीचा मेसेज पाठवला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

मुंबईत महिला शिक्षिकेने वर्षभर एका अल्पवयीन विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केल्याच्या धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आल्याने खळबळ माजली. यावरून सुरू झालेला गदारोळ शांत झालेला नसतानाच सुसंस्कृतांचे शहर अशी ओळख असलेल्या पुण्यात भयानक प्रकार उघडकीस आला आहे. कोंढवा भागातील एका पॉश सोसायटीमध्ये कुरिअर बॉय बनून शिरलेल्या तरूणाने त्या सोसायटीतील 22 वर्षीय तरूणीच्या तोंडावर स्प्रे मारला आणि तिच्यावर अत्याचार केला. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

Disha Salian case : दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना क्लिनचीट…

हे प्रकरण उघड झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला. पोलिसही कारवाईला आले. आरोपी कुरियर बॉयच्या वेशात पॉश कॉलनीत घुसला. पीडितेने दरवाजा उघडताच तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारण्यात आला. पीडितेला काही समजण्यापूर्वीच आरोपीने तिच्यावर हल्ला करत बलात्कार केला, आणि पळून गेला. आरोपीला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी होत आहे. मुलीसोबत क्रूरतेची ही घटना उघडकीस आली. पीडित तरूणीसोबत तिचा भाऊही तेथे राहतो. मात्र घटनेच्या वेळी तो गावी गेला असल्याने पीडित घरात एकटीच होती. कुरिअर बॉय म्हणून ओळख करून देत आरोपीने सोसायटीत प्रवेश केला. तो पीडितेच्या घरी गेला. व कुरिअर आल्याचे त्याने तिला सांगितलं. मात्र हे माझं कुरिअर नाही असं तरूणीने सांगितल्या नंतरही आरोपीने सांगितले की, तिला त्यावर सही करावी लागेल. यावर महिलेने सेफ्टी डोअर उघडले असता आरोपीने डाव साधला, आणि पीडितेच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला. मुलीला काही समजण्यापूर्वीच तिच्यावर हल्ला आणि बलात्कार केला.

तरूणीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाचा कारनामे ऐकून सामान्य नागरिकांसह पोलिसही हादरले आहेत. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने महिलेचा मोबाईल घेत, त्यामध्ये सेल्फी काढल्याचे सांगण्यात येत आहे. नंतर त्याने त्याच मोबाईल मध्ये ‘ मी परत येईन’ असा मेसेज टाइप केला. एवढंच नाही तर या घटनेबाबत कोणाकडेही वाच्यता केली तर मी हे फोटो व्हायरल करेन अशी धमकीही त्या तरूणीला दिली असे सांगण्यात येत आहे.

Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : १५ वर्षांपासून मुनगंटीवार लागले होते मागे, आता पोंभूर्ण्याची एमआयडीसी लवकरच होणार !

याप्रकरणी कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध सुरू आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची गुन्हे शाखेची 5 आणि पोलिसांची 5 अशी 10 पथकं आरोपीचा माग घेत आहेत. तसेच, कुरिअर बॉय बनून आलेला तो आरोपी नेमका कोण होता, आणि तो पीडितेला कसा ओळखत होता. हे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोसायटीमध्ये आणि आजूबाजूला बसवलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज ही ताब्यात घेण्यात आलं असून त्याचीही तपासणी सुरू आहे.