perverted way of teacher from a school that is among the top five in the country : देशातील टॉप फाईव्ह मध्ये असलेल्या शाळेतील शिक्षिकेचे विकृत चाळे
Mumbai : देशातील प्रमुख पाच शाळांपैकी एक मानल्या जाणाऱ्या, मुंबईतील प्रतिष्ठत शाळेतील एका शिक्षिकेवर गंभीर आरोप होत आहेत. तिने शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नेऊन त्यावर अत्याचार करत त्याचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. गुरुस्थानी असलेल्या शिक्षिकेनेच अल्पवयीन मुलावर अत्याचार करण्यासाठी विकृत मार्ग निवडल्याचे समोर आल्यामुळे एकच खळबळ माजली आहे.
शिक्षकांना, गुरू प्रसंगी देवाचा दर्जा देण्यात येतो. त्यांचा आशिर्वाद घेतला जातो. पण शिक्षणाचे पवित्र कार्य करणाऱ्या एका महिला शिक्षिकेचे भयानक कृत्य केल्याची घटना समोर आली आहे. प्रत्येक पालक हे मुलांना खूप विश्वासाने शाळेत पाठवतात, शिक्षकांवर त्यांचा मोठा विश्वास असतो. मात्र मुंबईतील एका प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिकेने असे कृत्य केलं त्यामुळे शिक्षकच भक्षक बनल्याची चर्चा आहे. देशातील टॉप पाच शाळांपैकी एक मानल्या जाणाऱ्या, मुंबईतील एका शाळेतील शिक्षिकेने तिच्या विद्यार्थ्यावर अत्याचार करत त्याचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी संबंधित शिक्षिकेला बेड्या ठोकून अटक केली आहे. ती शिक्षिका गेल्या वर्षभरापासून अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण करत होती, असा आरोप आहे. आणि हा प्रकार ती मुलाला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नेऊन करत होती. हा भयाक , प्रकार उघडकीस आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. दादर पोलिसांनी त्या शिक्षिकेविरुद्ध पोक्सो कायदा, बाल न्याय कायदा आणि फौजदारी संहितेच्या गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
शिक्षकेविरोधात नोंदवण्यात आलेले सर्व कायदे मुलांविरुद्ध लैंगिक गुन्हे करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी बनवण्यात आले आहेत. प्राप्त माहितीनुसार, ही शिक्षिका विद्यार्थ्यावर मानसिक दबाव आणायची आणि त्याला गप्प बसवायची. तसेच ती त्याला मद्य आणि नैराश्य येऊ नये यासाठी औषधे देत असे. या औषधांमुळे विद्यार्थ्याची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमताही कमकुवत व्हायची. तो भीतीच्या सावटाखाली आणि संकोचून जगत होता. आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराबद्दल तो कोणालाही सांगू शकत नव्हता.
विशेष बाब म्हणजे आरोपी शिक्षिकेने हे घृणास्पद कृत्य अनेक वेळा केल. गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरू होता. आरोपी शिक्षिका शालेत शिकवायची. त्यानंतर ती पीडित विद्यार्थ्याला हुशारीने दक्षिण मुंबईतील अनेक फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये न्यायची आणि त्याच्यावर अत्याचार करत लैंगिक शोषण करायची.
बराच काळ सगळं सहन केल्यानंतर अखेर विद्यार्थ्याने बारावीची परीक्षा दिली आणि पालकांना संपूर्ण सत्य सांगितले. त्या शिक्षिकेने त्याला एका नोकराद्वारे बोलावले आणि नंतर अनेक वेळा लैंगिक शोषण कसे केले, त्याचा संपूर्ण घटनाक्रम त्या विद्यार्थ्याने सांगितला. हे कळाल्यावर त्या विद्यार्थ्याचे आई-वडील हादरले. त्यांनी हिंमत दाखवली आणि मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांत धाव घेतली. सर्व प्रकार सांगत त्या शिक्षिके विरोधात तक्रार दाखल केली. अखेर दादर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी शिक्षिकेला अटक केली असून ती सध्या पोलीस कोठडीत आहे.