Pune BJP office bearer resigns, accused of molesting female police officer : नितीन गडकरी यांच्या पुणे दौऱ्याच्यावेळी घडला होता प्रकार
Pune : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुणे दौऱ्यावर असताना बंदोबस्तावर असलेल्या एका महिला पोलिस निरीक्षकाला भाजपच्या पदाधिकाऱ्याने नको त्या ठिकाणी स्पर्श केला, असा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार घडल्यानंतर त्या पोलिस निरीक्षकाने विनयभंगाची तक्रार दाखल केली. त्यानंतर भाजप पदाधिकाऱ्याने राजनीमा दिला आहे. प्रमोद कोंढरे असे त्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे.
एका कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुण्याला येणार होते. या कार्यक्रमासाठी भाजपचे नेते आणि काही कार्यकर्ते शनिवार वाड्याजवळ एकत्र आले होते. गडकरींना येण्यासाठी अवकाश असल्याने आमदार हेमंत रासने हे आपल्या कार्यकर्त्यांना आणि पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तेथीलच एका ठिकाणी चहा पिण्यासाठी घेऊन गेले. दरम्यान प्रमोद कोंढरे याने गर्दीचा फायदा घेत महिला पोलिस निरीक्षकाचा विनयभंग केल्याचा आरोप केला गेला आहे.
Tara Bhavalkar : हिंदी भाषा सक्तीची असे सरकारने कुठेही म्हटले नाही पण….
विनयभंगाचा आरोप करण्यात आल्यानंतर प्रमोद कोंढरे यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, नेमका काय प्रकार घडला, याची माहिती घेत आहो. गर्दीमध्ये चुकून हे घडले का, हेही तपासले जाईल. पोलिसांना चौकशीत अडथळा येऊन नये म्हणून कोंढरे यांनी राजीनामा दिला आहे. तक्रार झाल्यानंतर तातडीने कार्यवाही करण्यात आली. आमच्यामध्ये कुठलीही गटबाजी नाही. कोंढरेंनी त्यांच्यावर लावलेले आरोप फेटाळले आहेत.
Compulsory Hindi language : मराठी अभिनेते, क्रिकेटपटू बॅकफूटवर; पण सयाजी शिंदे फ्रंट फूटवर !
घटना सीसीटीव्हीत कैद..
गर्दीचा फायदा घेऊन महिला पोलीस निरीक्षकाला चुकीच्या ठिकाणी स्पर्श केल्याचा आरोप प्रमोद कोंढरे यांच्यावर झाला आहे. हा प्रकार चहाच्या दुकानाजवळ असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. हे फुटेज काढून तपासल्यानंतरच विनंयभंगाचा गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.