Cyber fraud : मी एनआयएचा अधिकारी बोलतोय, तुमचं नाव दहशतवादी हल्ल्यात !

A scammer calls an elderly man; swindles him of over 1.5 crores : वृद्धाला भामट्याचा फोन; तब्बल दीड कोटींना गंडा

Pune : एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रीय तपास संस्था एनआयएचा अधिकारी असल्याचा बनाव करत एका भामट्याने 70 वर्षीय वृद्ध नागरिकाची तब्बल 1 कोटी 44 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. “तुमचं नाव पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित आर्थिक व्यवहारात आलं आहे” असा खोटा आरोप करून या वृद्धाला गुन्हेगार ठरवलं जाईल, या भीतीचा गैरफायदा घेत आरोपीने ही चलाखीने रचलेली फसवणुकीची कहाणी राबवली.

ही घटना 23 सप्टेंबर 2025 ते 8 ऑक्टोबर 2025 या कालावधीत घडली. कोथरुड येथील महात्मा सोसायटी रस्त्यावर राहणाऱ्या या वृद्धाला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला “एनआयएचा वरिष्ठ अधिकारी” म्हणून ओळख करून दिली आणि थेट सांगितले की, “तुमचं बँक खातं पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित आर्थिक व्यवहारात वापरण्यात आलं आहे. तुमच्यावर गंभीर संशय आहे. जर सहकार्य केलं नाही, तर कायदेशीर कारवाई केली जाईल.”

Reservation controversy : निवडणुकांमध्ये मूळ ओबीसींना फटका बसणार

अचानक आलेल्या या आरोपाने आणि अधिकृत आवाजात बोलणाऱ्या व्यक्तीमुळे वृद्ध नागरिक घाबरले. त्यानंतर भामट्याने पुढील “तपास प्रक्रिया” समजावून सांगितली. त्याने सांगितले की, “तपास पूर्ण होईपर्यंत तुमच्या सर्व खात्यातील रक्कम तात्पुरती सुरक्षित सरकारी खात्यात जमा करावी लागेल.” भीतीच्या वातावरणात वृद्धाने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि विविध खात्यांतून एकूण 1.44 कोटी रुपये त्या भामट्याने दिलेल्या खात्यांवर पाठवले.

Bachchu Kadu : अरे आत्महत्या करण्याऐवजी एखाद्या आमदाराला कापून टाका !

काही दिवस उलटून गेल्यानंतरही रक्कम परत मिळाली नाही आणि फोन करणाऱ्याशी संपर्क तुटला. यानंतर तक्रारदाराने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ चौकशी सुरू केली असून अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मधील कलम 66 (डी) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट यांनी उपोषणकर्त्याला घरी बोलावून घेतले !

या प्रकरणी पोलिसांकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. “कोणतीही अनोळखी व्यक्ती स्वतःला सरकारी अधिकारी किंवा तपास संस्थेचा सदस्य असल्याचं सांगून पैसे मागत असेल, तर अशा प्रकरणांना गांभीर्याने न घेता त्वरित सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क साधा,” असा सल्ला पोलिसांनी दिला आहे.

____