Politics flared up over the Education Minister’s program : उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांची महायुती सरकारवर जोरदार टीका
Buldhana राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या बुलढाणा जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांकडून साफसफाईची कामं करून घेतल्याचा प्रकार समोर आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या राज्य प्रवक्त्या अॅड. जयश्री शेळके यांनी महायुती सरकारवर आणि शिक्षण विभागावर तीव्र शब्दांत टीका केली आहे.
“शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना झाडू हातात द्यायचा, आणि नंतर त्याच मुलांना बिस्किट देऊन स्वागत करायचं – ही नौटंकी बंद झाली पाहिजे,” अशा शब्दांत शेळके यांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवली.
MLA Siddharth Kharat : शेतकऱ्यांना त्रास दिलात तर गाठ माझ्याशी; आमदारांचा महावितरणला इशारा
सिनगाव जहांगीर (ता. बुलढाणा) येथील प्राथमिक शाळेतील एका व्हिडीओमध्ये विद्यार्थ्यांकडून कचरा उचलणे, शाळा झाडणे, पाण्याच्या बाटल्या वाहून नेणे अशी कामं करून घेतल्याचे दृश्य दिसून आले. शिक्षण वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी काम करताना दिसत असल्याने अनेक पालक आणि स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिक्षण विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Mahayuti Government : अजितदादांच्या खात्यावर आता शिंदेंच्या मंत्र्यांचा ‘वॉच’
दादाजी भुसे विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेत पोहोचणार होते, मात्र त्यांच्या आगमनाआधीच शिक्षकांनी काही विद्यार्थ्यांकडून स्वच्छता कामे करवून घेतली. त्यामुळे कार्यक्रमाचा साजशृंगार करण्यासाठीच विद्यार्थ्यांचा वापर झाल्याचा आरोप आता होत आहे.
या प्रकरणानंतर विरोधी पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, सरकारच्या शिक्षण क्षेत्रातील “प्रत्यक्ष कृती आणि घोषणांमधील विसंगती” यावर अनेकांनी बोट ठेवले आहे. अॅड. जयश्री शेळके म्हणाल्या, “शिक्षणाचा अधिकार कायद्याने मुलांना शिक्षण देणे हे सरकारचे कर्तव्य आहे, त्यांच्याकडून श्रम करवून घेणे हे बालहक्कांचे उल्लंघन आहे.”
Raju shetti : मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचे मालक नव्हे,हे तर लुटारूंचे टोळके
दरम्यान, संबंधित व्हिडीओच्या अनुषंगाने शिक्षण विभागाकडून प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, हा प्रकार केवळ अपवाद आहे की व्यापक व्यवस्थेतील त्रुटी, याचा उलगडा अद्याप व्हायचा आहे.