Bharat Gogavales clarification on the dance bar issue : डान्सबार प्रकरणावर भरत गोगावले यांचे स्पष्टीकरण
Solapur : पनवेलमधील डान्सबारवर मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या तोडफोडीनंतर राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बार आहेत, पण सगळीकडेच अश्लील प्रकार घडत नाहीत. ज्या ठिकाणी चुकीच्या प्रकारांची माहिती मिळेल, तिथे सरकारकडून योग्य ती कारवाई केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
गोगावले सोलापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. “डान्सबारवर मागेच बंदी घालण्यात आली आहे. करमणूक म्हणून काही गोष्टींना मर्यादित परवानगी आहे. मात्र बिभत्स प्रकार किंवा अनधिकृत कृत्यांना राज्य सरकार सहन करणार नाही,” असेही त्यांनी सांगितले.
Buldhana BJP : भाजपने रणशिंग फुंकले, कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश
शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यात डान्सबार वाढल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडात एवढ्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत डान्सबार कसे काय?” असा थेट सवाल त्यांनी विचारला होता.
Malegao Encroachment : माळेगाव वनजमिनीवरील अतिक्रमणावर मोठी कारवाई
या वक्तव्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी पनवेलमधील एका डान्सबारची तोडफोड केली होती. या प्रकरणात मनसे शहराध्यक्ष योगेश चिले आणि सात कार्यकर्त्यांना पनवेल पोलिसांनी अटक केली होती. आता त्यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.भाजप आमदार परिणय फुके यांनी केलेल्या “शिवसेनेचा बाप मी आहे” या वक्तव्यावरही गोगावले यांना विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी “ते कोणत्या सेनेबद्दल बोलले ते तपासावं लागेल,” असं उत्तर दिलं.