Davos Summit 2026 : विदर्भाचा कायापालट! दावोसमध्ये ५.९२ लाख कोटींची ऐतिहासिक ‘लॉटरी’

massive-investment-boost-for-nagpur-vidarbha : नागपूर आता जागतिक औद्योगिक नकाशावर; ११ दिग्गज कंपन्यांशी करार, ४७ हजार तरुणांच्या हाताला मिळणार काम

Mumbai स्वित्झर्लंडमधील दावोस येथे पार पडलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत (WEF) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भाच्या विकासाचा जणू महाविस्फोटच केला आहे. नागपूर विभाग आणि संपूर्ण विदर्भाच्या औद्योगिक उत्थानासाठी तब्बल ५,९२,७४६ कोटी रुपयांच्या महागुंतवणुकीवर मोहोर उमटवण्यात आली आहे.

या ऐतिहासिक करारामुळे केवळ विदर्भाचा चेहरामोहराच बदलणार नाही, तर तब्बल ४७ हजार प्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होणार आहे. उद्योग, ऊर्जा आणि प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रात विदर्भाला ‘ग्लोबल हब’ बनवण्याच्या दिशेने हे आतापर्यंतचे सर्वात मोठे पाऊल मानले जात आहे.

या महागुंतवणुकीत सर्वात मोठा धमाका ‘जेएसडब्ल्यू’ (JSW) ग्रुपने केला असून, त्यांनी एकट्याने स्टील, ऊर्जा आणि सिमेंट क्षेत्रात ३ लाख कोटींच्या गुंतवणुकीचा विडा उचलला आहे. विशेष म्हणजे, नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याला औद्योगिक मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तेथे १ लाख कोटींचे वेगळे स्टील प्रकल्प उभारले जाणार आहेत.

Devendra Fadnavis : ‘आता तरी गप्प बसा!’; फडणवीसांनी थेट सुनावले

याशिवाय, हरित ऊर्जेच्या क्षेत्रात ‘पॉवरिंग एनर्जी’ (६०,२९९ कोटी) आणि ‘वारी एनर्जी’ (३०,००० कोटी) यांनी विदर्भातील ऊर्जेचे चित्र बदलण्याची तयारी दर्शवली आहे. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात ‘वर्धमान लिथियम’ आणि ‘हॉयझिरो’ यांसारख्या कंपन्या हजारो नोकऱ्यांची खात्री देत आहेत.

केवळ भारी उद्योगच नव्हे, तर कृषी क्षेत्राला बळ देण्यासाठी ‘रिलायन्स कंज्युमर प्रॉडक्ट्स’ काटोल येथे १५०० कोटींचा अन्न प्रक्रिया प्रकल्प उभारणार आहे. प्रशासनाने या सर्व प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या २३,२७६ एकर जमिनीपैकी १४६६ एकर जमिनीचा ताबा आधीच दिला आहे.

Mayoral election : प्रदेशाध्यक्षांचा आदेश, मात्र कारवाई वेगळी; जोरगेवारांची पुन्हा बंडखोरी!

कंपन्यांना अधिकृत ‘ऑफर लेटर’ देऊन कामाला गती देण्याचे आदेश दिले आहेत. दावोसच्या या यशानंतर आता नागपूर आणि विदर्भ हे केवळ राज्याचेच नव्हे, तर देशाचे औद्योगिक इंजिन ठरणार, हे स्पष्ट झाले आहे.