Mohammad Badruzma appointed as NCP district president : बद्रुजमा यांच्याकडे राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा
Akola उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाने अकोल्यात नव्या राजकीय समीकरणांची चाचपणी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जुने कार्यकर्ते मोहम्मद बद्रुजमा यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करून मुस्लिम समाजात आमदार साजिद खान पठाण यांना पर्याय देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.
बद्रुजमा हे मूळचे काँग्रेस पक्षातील आहेत. अजित पवार गटात दाखल होण्यापूर्वी काँग्रेस कामगार सेलचे प्रदेश पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या नियुक्तीमुळे स्थानिक राजकारणात नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
या आधी कृष्णा अंधारे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. मात्र त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला रामराम ठोकत बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला. दुर्दैवाने निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर त्यांनी “मी अजूनही राष्ट्रवादीतच आहे” असा दावा करत पुनश्च पक्षात सक्रिय होण्याचा प्रयत्न केला.
Ajit Pawar : काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना सुखरुप परत आणू, नातेवाईकांनी घाबरू नये !
दरम्यान, बद्रुजमा यांच्या रूपाने अजित पवार गटाने मुस्लिम मतदारांमध्ये नवीन नेतृत्व उभे करण्याचा डाव आखल्याचे स्पष्ट झाले आहे. हे नेतृत्व साजिद पठाण यांच्यासमोर पर्याय म्हणून उभे राहत असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याचा राजकीय प्रभाव दिसून येण्याची शक्यता आहे.
DCM Ajit Pawar : काय सांगता? अकोला विमानतळाचे उड्डाणही लवकरच!
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…
अजित पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून बदल केल्याचे बोलले जात आहे. अद्याप निवडणुका जाहीर झालेल्या नसल्या तरीही दिवाळीच्या आसपास होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीमध्ये मोठा बदल मानला जात आहे.