Breaking

DCM Ajit Pawar Tukaram Bidkar : अजितदादा पोहोचले बिडकर कुटुंबियांच्या भेटीला

Ajit Pawar consoled the Bidkar family : तुकाराम बिडकर यांच्या आठवणींनी दिला उजाळा

Akola विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार स्व. तुकाराम बिडकर यांचे दोन दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले. अजित पवार यांचे खास सहकारी म्हणून देखील त्यांनी ओळख होती. निधनाचे वृत्त कळल्यानंतर त्यांनी भावना देखील व्यक्त केल्या होत्या. मात्र शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार बिडकर कुटुंबियांच्या सांत्वनासाठी थेट अकोल्यात दाखल झाले.

तुकाराम बिडकर सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रांचे जाणकार होते. तसेच विकासासाठी कार्यशील नेतृत्व होते. त्यांच्या अकस्मात निधनाने मोठी हानी झाली आहे, अशी भावना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. उपमुख्यमंत्र्यांनी बिडकर यांच्या अकोला येथील रामनगर परिसरातील निवासस्थानी भेट दिली. त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली आणि सांत्वन व्यक्त केले.

Mahayuti Government : २४ तासात वीज जोडणीचा दावा फोल

यावेळी खासदार सुनील तटकरे, आमदार किरण सरनाईक, आमदार विक्रम काळे, आमदार अमोल मिटकरी यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक आणि प्रशासनिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष तथा आमदार तुकाराम बिडकर यांचे गुरुवारी सायंकाळी अपघाती निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केली.

शुक्रवारी बिडकर यांच्या पार्थिवावर त्यांच्या इच्छेनुसार अंतिम संस्कार करण्यात आले. शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व इतर महत्त्वाच्या नेत्यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

CJI Sanjeev Khanna : कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही!

स्व. बिडकर यांनी सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य केले. ते अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे, लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे, सामाजिक प्रश्नांची जाण असलेले आणि विकासाच्या दृष्टिकोनातून कार्यरत असलेले सच्चे लोकनेते होते. त्यांनी शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रसार केला, सामाजिक न्यायासाठी लढा दिला आणि युवकांना दिशा देणारे नेतृत्व दिले, असं अजित पवार म्हणाले.
“त्यांच्या विचारधारेतून आणि कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळाली. त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहतील,” असे भावनिक उद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.