Breaking

DCM Eknath Shinde : गोळीचा जवाब तोफेने देणारा भारत आता नवभारत आहे

Deputy Chief Minister Shinde salutes the Indian Army : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद पुरस्कार प्रदान

Buldhana “गोळीचा जवाब तोफेने देणारा भारत आता नवभारत आहे. आतंकवाद्यांनी भारतीयांच्या नादी लागू नये, भारतीय लष्कर हे दाखवून देत आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलडाणा येथे केले.

बुलडाणा तालुक्यातील इसरूळ येथे आयोजित संत चोखामेळा पुण्यतिथी सोहळा १० ते १८ मे या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. गीता परिवार संस्थेचे निलेश महाराज झरेकर यांना हा पुरस्कार श्रीराम जन्मभूमी मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

Mahadeo Jankar : वाटाघाटी बरोबर करा, नाहीतर एनडीएला रामराम ठोकू!

यावेळी व्यासपीठावर आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेता महाले, जिल्हा प्रमुख बळीराम मापरी राजपूत, ओमसिंग राजपूत, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश जाधव, महिला आघाडी जिल्हा प्रमुख मायाताई म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, “देशाचे खंबीर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवले आहे. पहलगाम येथे आपल्या बहिणीच्या कपाळावरचे कुंकू पुसणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवण्यात आले.”

ते पुढे म्हणाले, “मी समाजाचा कार्यकर्ता आहे, सत्तेचा नाही. समाजातील प्रत्येक अडचणीत असलेल्या व्यक्तीच्या मदतीसाठी कायम तयार आहे.” “लाडकी बहिण योजना कधीही बंद होणार नाही, कारण लाडक्या शेतकरी, बहिणी आणि भावांनी आम्हाला भरभरून मतदान दिलं. आम्ही टीम म्हणून काम करत आहोत आणि करत राहू,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

Rashtriya Swayamsevak Sangh : संघ म्हणतो, ‘गांधींमुळे जगात भारताला मिळाली ओळख’

राज्यातील ४७ हजार बंदीवानांना भगवद्गीतेच्या माध्यमातून सुधारण्याचे कार्य केल्याबद्दल निलेश महाराज झरेकर यांना विवेकानंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला वारकरी संप्रदायाचे शेकडो सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.