Breaking

DCM Eknath Shinde : शिंदेंचा टोला; नेते युरोपात, कार्यकर्ते कोमात

I have never bowed down for power : घरात बसून काम केले, जनतेने त्यांना घरातच बसवले

Amravati : “शिवसेना ही सर्वसामान्य माणसांची आहे. घरात बसून नव्हे, तर रस्त्यावर उतरून काम करावे लागते. म्हणूनच मागील विधानसभा निवडणुकीत ‘त्यांना’ जनता घरी बसवून गेली,” अशी बोचरी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांचे नाव न घेता केली. “आता नेते युरोपात फिरत आहेत आणि कार्यकर्ते कोमात गेले आहेत,” अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला.

शिवसेनेच्या वतीने संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर उद्योगमंत्री उदय सामंत, सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट, जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, एससी-एसटी आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ, माजी आमदार अभिजित अडसूळ, प्रीती बंड, श्याम देशमुख, गजानन वाकोडे, संतोष बद्रे, आशिष धर्माळे, अरुण पडोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Operation Sindoor : लष्कराने स्पष्ट केले ड्रोन हल्ल्याचे कारण !

कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रीती बंड यांचे समर्थक धनंजय बंड, सुनील डिके, गोपाल लाजूरकर, सतीश काळे आदींनी शिवसेनेत प्रवेश केला.

पुढे बोलताना शिंदे म्हणाले, “राज्यात लोकप्रिय झालेली ‘लाडकी बहीण’ योजना कधीच बंद होणार नाही. विरोधक काहीही बोलू द्या, कारण याच बहिणीमुळे मला ‘लाडका भाऊ’ हे सर्वोच्च पद मिळाले आहे. मी सत्तेसाठी कधी झुकलो नाही आणि झुकणारही नाही.”

Operation Sindoor : सामान्यांना इजा न होऊ देता मोडले दहशतवादाचे कंबरडे !

काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांचा उल्लेख करत त्यांनी म्हटले, “पाकिस्तानला धडा शिकवावा लागेल, असे मी आधीच सांगितले होते. ‘इट का जवाब पथ्थर से, खून का बदला खून से’ असे म्हणालो होतो, पण केंद्र सरकारने तर ‘खून का जवाब मिसाईल से’ दिला आहे. पाकिस्तानकडे जेवायला रेशन नाही आणि अणुबॉम्बच्या फुसक्या बाता करतात.”

शिंदे पुढे म्हणाले, “पाहलगाम येथे हल्ला झाल्यानंतर मी स्वतः काश्मीरला गेलो. घरात बसून चालत नाही. महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी मी स्वतः नियोजन केले.”