Police come back empty-handed after a week : नवनीत राणा धमकी प्रकरणाचा तपास रखडला
Amravati माजी खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्याच्या प्रकरणात तपासासाठी उत्तर प्रदेशात गेलेली अमरावती पोलिसांची विशेष टीम सात दिवसांच्या चौकशीनंतर कोणताही ठोस पुरावा न मिळाल्याने रिकाम्या हाताने परतली आहे. मुख्य आरोपीचा मोबाईल क्रमांक ट्रेस करण्यात अपयश आल्याने तपासाला मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवार, १८ जानेवारी रोजी सकाळी एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरून पोलीस कंट्रोल रूमवर फोन करून माजी खासदार नवनीत राणा यांना बाबा सिद्दीकीप्रमाणे अंजाम देण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर संबंधित आरोपीने पोलीस कंट्रोल रूमवर एक संदेशही पाठवला होता. या संदेशात दोन अज्ञात मोबाईल क्रमांक नमूद करण्यात आले होते.
Ajit Pawar death news : नगरपालिका निवडणूक प्रचाराच्या सभा ठरल्या अखेरच्या
या धमकीनंतर राजापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता राजापेठ पोलिसांची एक विशेष तपास पथक मध्यप्रदेश व उत्तर प्रदेश येथे रवाना करण्यात आली होती.
मेसेजमध्ये नमूद मोबाईल क्रमांकांच्या आधारे राजापेठ पोलीस उत्तर प्रदेशातील दीपा पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात पोहोचले. चौकशीत संबंधित दोन संशयित व्यक्ती एका विशिष्ट समुदायाशी संबंधित असून ते त्यांच्या घरातून बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्यांच्या नातेवाइकांची चौकशी करून आवश्यक माहिती संकलित केली आहे. मात्र, मुख्य धमकी देणारा मोबाईल क्रमांक ट्रेस करण्यात अपयश आल्याने पोलिसांना अद्याप कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही.
Ajit Pawar death news : ‘दादा मध्यरात्रीही फोन करायचे…’; राजेंद्र शिंगणेंकडून आठवणींना उजाळा
दरम्यान, पोलिस तपासात हे स्पष्ट झाले आहे की धमकीचा फोन अमरावती परिसरातूनच पोलीस कंट्रोल रूमवर करण्यात आला होता. तथापि, नंतर पाठविण्यात आलेल्या संदेशात उत्तर प्रदेशातील मोबाईल क्रमांक आढळल्याने संबंधित व्यक्तींचे उत्तर प्रदेशाशी संबंध असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू असून तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार आहे.








