Breaking

Chandrashekhar Bawankule : पालकमंत्रीपदाचा निर्णय दोन दिवसांत !

Decision of guardian minister post in two days Information of Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

Nagpur Chandrashekhar Bawankule केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बावनकुळेच नागपूरचे पालकमंत्री होतील, असे म्हणत पेपर फोडला. पण अद्याप राज्य सरकारने यादीच जाहीर केलेली नाही. त्यामुळे त्यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. मात्र हा प्रश्न फक्त बावनकुळेंचा नसून संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा आहे. मात्र आता प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बावनकुळे यांनी दोन दिवसांच्या आत हा निर्णय होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

भाजपा- महायुती सरकारमध्ये पालकमंत्रिपदाबाबत कोणताही तिढा नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार हे परदेशात गेले होते. त्यामुळे चर्चा झाली नाही. पालकमंत्रिपदासंदर्भात फारतर दोन दिवसांत निर्णय होईल. असा दावा महसूल मंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. राज्यात खात्यांचे वाटप झाल्यावरदेखील पालकमंत्रीपदाबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे विविध कयास वर्तविण्यात येत आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोलदेखील केला होता.

Backlog of Vidarbha : वैधानिक विकास मंडळाच्या मुदत वाढीचे काय झाले?

या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी सोमवारी (६ जानेवारी) सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका मांडली. यावेळी मुख्यमंत्र्यांशी झुडूपी जंगलांवरदेखील चर्चा झाल्याचे सांगितले. विदर्भात ८६ हजार हेक्टर झुडपी जंगल जमिनी आहेत. त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. काही झुडपी जंगल जमिनी विभागीय आयुक्तांकडून सोडवण्यासाठीचा अहवाल सादर झाला आहे, असं बावनकुळे म्हणाले.

या झुडपी जंगल जमिनींवर काही लोकांची घरे आहेत. ती घरे कायदेशीर करून देण्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. ही घरे कायदेशीर करण्यासंदर्भात लवकरच प्रक्रिया सुरू होणार आहे, असे ते म्हणाले.

Amravati District : ६३ सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ

अतिविलासी उद्धव ठाकरे
अतिविलासी उद्धव ठाकरे मातोश्री-२मध्ये कसे राहतात. कसा अतिविलास करतात. अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कसा अतिविलास केला. हे सर्व ‘सामना’मध्ये छापून आले असते, तर बरे झाले असते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी अतिविलासावर बोलू नये. खरं तर केजरीवालांच्या ‘शीशमहल’ला सपोर्ट करण्यासाठी उद्धव ठाकरे हे बोलत आहेत, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

मोदींवर बोलण्याची लायकी नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदीवर बोलण्याची उद्धव ठाकरे यांची लायकी नाही. त्यांनी आधी आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि मग मोदींवर बोलले पाहिजे, अशी टीका बावनकुळे यांनी केली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून सातत्याने उद्धव ठाकरे यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत, हे विशेष.