Sanjay Gaikwad’s sensational allegations against Congress state president : संजय गायकवाडांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर खळबळजनक आरोप
Buldhana : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधारी 21 आमदारांना दिवाळी भेट म्हणून ‘डिफेंडर’ कार ठेकेदाराकडून देण्यात आल्याचा आरोप केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यावर आता बुलडाण्याचे शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी सपकाळ यांच्यावर पलटवार करत खळबळजनक आरोप केले आहेत. “सपकाळ यांनी बुलडाण्यात आमदार असताना एड्सग्रस्त महिलांच्या यादीत चांगल्या चांगल्या महिलांचा समावेश करून त्यांचे अनुदान लाटले,” असा गंभीर आरोप गायकवाड यांनी केला आहे.
सपकाळ यांनी काही दिवसांपूर्वी बुलडाण्यातील पत्रकार परिषदेत दावा केला होता की, राज्यातील 21 सत्ताधारी आमदारांना एका ठेकेदाराने ‘डिफेंडर’ गाड्या दिल्या असून, त्यापैकी एक गाडी बुलडाण्यात फिरत आहे. या वक्तव्याने सत्ताधाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. “तो ठेकेदार कोण आणि त्या गाड्या कोणत्या आमदारांकडे आहेत, ही माहिती मी लवकरच देणार आहे,” असे सपकाळ यांनी म्हटले होते.
Sudhir mungantiwar : मुनगंटीवारांची झोपडपट्टीतील चिमुकल्यांसोबत दिवाळी
यावर प्रत्युत्तर देताना आमदार संजय गायकवाड म्हणाले, “सपकाळ यांनी केलेले आरोप पूर्णपणे बिनबुडाचे आहेत. प्रसिद्धीसाठीच असे आरोप करून ते लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. आमदारांच्या गाड्यांवरील सिम्बॉल विधानसभेने दिले आहेत. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्व आमदारांच्या गाड्यांवर ते सिम्बॉल असतात. जर सपकाळ यांना हे तमाशा वाटत असेल, तर त्यांनी राज्यातील सर्व आमदारांना सिम्बॉल काढायला सांगावे.”
BMC Election 2025: भाजपचा “150 पार” नारा, शिंदे दिल्लीला रवाना
गायकवाड यांनी सपकाळ यांच्यावर अधिक गंभीर आरोप करत म्हटले, “डिफेंडर कार 21वी आहे की 22वी हे शोधायच्या आधी त्यांनी स्वतः बुलडाण्यात आमदार असताना एड्सग्रस्त महिलांच्या अनुदान योजनेतील गैरव्यवहारांचा शोध घ्यावा. त्यांनीच त्या निधीचा गैरवापर केला होता.” या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Bangladeshi infiltrators : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार !
दरम्यान, हर्षवर्धन सपकाळ यांनी दिवाळीनंतर या प्रकरणाचा घोटाळा बाहेर काढण्याचा इशारा दिला होता. त्यावर गायकवाड म्हणाले, “सरकारला सध्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठीसुद्धा आर्थिक कसरत करावी लागत आहे. वर्षभरात काँग्रेसकडून एकही ठोस काम झाले नाही, मग सपकाळ कुठून घोटाळा शोधणार?” असे खोचक वक्तव्य त्यांनी केले.
डिफेंडर कार प्रकरणामुळे बुलडाण्यातील राजकीय वातावरण तापले असून, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला अधिकच तीव्र झाला आहे. आता सपकाळ यांची पुढील भूमिका काय असते आणि गायकवाड यांच्या गंभीर आरोपांवर ते काय उत्तर देतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
_____








