Strong stance of Raj, Uddhav, Pawar, Patil : राज, उद्धव, पवार, पाटील यांची तीव्र भूमिका
Mumbai : महाराष्ट्रातील आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज एक अभूतपूर्व घटना घडली. मनसे आणि महाविकास आघाडी (मविआ) या दोन्ही राजकीय आघाड्यांची दोन स्वतंत्र शिष्टमंडळं आज निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला गेली.
एक शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेतली, तर दुसरं शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या भेटीला गेले.
या दोन्ही शिष्टमंडळांनी मतदार याद्यांतील गंभीर विसंगती, दुबार नोंदणी, नावं वगळण्यातील पारदर्शकतेचा अभाव आणि व्हीव्हीपॅटचा वापर न करण्याचा निर्णय या मुद्द्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष व पारदर्शक ठेवण्याची मागणी केली.
Digital arrest : ज्येष्ठाला 72 लाख तर दुसऱ्याला 6 कोटींचा गंडा !
मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांच्या भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळात राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, जयंत पाटील (शेकाप), जयंत पाटील (राष्ट्रवादी), बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, संदीप देशपांडे यांचा समावेश होता.
तर दुसऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व अंबादास दानवे यांनी केले. त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे इतर नेतेही उपस्थित होते. राजकीय नेत्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मतदार यादीतील गंभीर घोळ, पारदर्शकतेचा अभाव आणि निवडणूक प्रक्रियेतील तांत्रिक त्रुटी याबद्दल तीव्र प्रश्न उपस्थित केले. बैठकीदरम्यान आणि त्यानंतर पत्रकारांना प्रतिक्रिया देताना नेत्यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले.
Sudhir Mungantiwar : जनतेच्या मनातील स्थान हेच सर्वात मोठे सिंहासन !
निवडणूक लागलेली नाही तरी मतदान नोंदणी बंद का केली? आज १८ वर्ष पूर्ण करणाऱ्यांना मतदानाचा हक्क का नाही? दोन दोन ठिकाणी मतदारांची नावं आहेत, वडिलांचं वय मुलापेक्षा कमी दाखवलंय हा निवडणूक आयोगाचा कोणता कारभार आहे?” ३१ जानेवारीपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश आहेत. आयोग सज्ज आहे का याचं उत्तर द्या. मतदार याद्यांमधील हा गोंधळ थांबवा आणि राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवा सविस्तर चर्चा हवी.”
Gadchiroli Naxal Surrender: नक्षलवादाच्या इतिहासातील सर्वात मोठे आत्मसमर्पण !
“मतदान कुणाला जातं हेच आता स्पष्ट नाही. देशात कुठेच निवडणुका नाहीत, मग व्हीव्हीपॅट मशीन का नाही वापरली जाणार? ईव्हीएमवर जनतेचा विश्वास उरलेला नाही. पारदर्शकतेसाठी व्हीव्हीपॅट अनिवार्य असायला हवी.” अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली.
शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी सवाल केले की, आम्ही दिल्ली आणि महाराष्ट्र आयोगाला पत्र दिलं, पण आयोग म्हणतो पत्रच आलं नाही. आमच्याकडे पुरावे आहेत की अनेक अस्तित्वात नसलेल्या घरांत मतदार नोंदलेले आहेत. दुबार नोंदणी काढण्यासाठी तांत्रिक सॉफ्टवेअर वापरा. खोटे मतदार लाखोंच्या घरात आहेत. आम्ही काही दिवसांत त्याचे पुरावे देणार आहोत.”
Maharashtra Government : आर्थिक स्थैर्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय
शिष्टमंडळाने केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये नावं वगळल्याचा तपशील प्रसिद्ध करावा, कोणाचं नाव मतदार यादीनं काढलं आणि का काढलं, हे सार्वजनिक संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावं.
ऑक्टोबर २०२४ ते जुलै २०२५ दरम्यानच्या नवीन नोंदणीची यादी जाहीर करावी ही माहिती लपवली जात असल्याचा संशय आहे.
१८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येकाला मतदानाचा हक्क मिळावा जुलै २०२५ नंतर वय पूर्ण करणाऱ्यांना वंचित ठेवणं अन्यायकारक. दुबार नोंदणी रोखण्यासाठी डी-डुप्लिकेशन तंत्र वापरावे इतर राज्यांत यशस्वी उदाहरणे देत महाराष्ट्रातही अशी मोहीम राबवावी.
महापालिका निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट अनिवार्य करावी व्हीव्हीपॅटशिवाय निवडणूक घेणं म्हणजे पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह. मुंबईत व्हीव्हीपॅट शक्य नसल्यास बैलेट पेपरवर निवडणूक घ्यावी. प्रभाग पद्धतीवरील ताशेरे ओढत, “प्रभाग पद्धतच रद्द करा” अशी मागणीही.
मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी या मागण्या आणि तक्रारी केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन दिलं. तर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि चोकलिंगम यांची उद्या एकत्रित बैठक होणार असून, त्यानंतरच पुढील निर्णयांवर चर्चा होईल. अशी भूमिका आयोगाने मांडले आहे. महाविकास आघाडी आणि मनसेने सांगितलं की, उद्या बैठकीनंतर एकत्रित भूमिका मांडू.
____








