Marathi schools should survive, children should speak in Marathi: दिल्ली येथील 98 व्या साहित्य संमेलनानिमित्त मराठीची चर्चा
Yavatmal मराठी भाषेला आधीच अभिजात भाषेचा दर्जा मिळणे आवश्यक होते. उशिरा का होईना परंतू तो मिळाला याचा फार आनंद आहे. दर्जामुळे मराठी भाषेच्या संवर्धन आणि वाढीसाठी प्रयत्न होतील. त्यासाठी मराठी शाळा जगल्या पाहिजे. इंग्रजी शाळांचे प्रमाण वाढत आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना मराठी भाषा समजणार नसेल तर पुढे हे विद्यार्थी मराठी भाषा कसे बोलतील, अशी चिंता जेष्ठ साहित्यिक डॅा.रमाकांत कोलते यांनी उपस्थित केली.
केंद्र शासनाने मराठी भाषेला ‘अभिजात भाषा’चा दर्जा दिल्यानंतरचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशाची राजधानी दिल्ली येथे होत आहे. त्यानिमित्ताने मराठी भाषा व तिचे अभिजात स्वरुप याविषयावर डॉ. कोलते यांच्याशी संवाद साधतांना ते बोलत होते.
Congress leader on Sahasram Korote : काँग्रेसशी गद्दारी करणारे भटकतच राहणार
डॉ. कोलते म्हणाले, ‘मराठी भाषेत कितीतरी महत्वाची कामे झाली आहे. डॅा.श्रीधर व्यंकटेश केळकर यांनी महाराष्ट्रीय ज्ञान भाषेचे मराठीतून 23 ते 24 खंड लिहिले आहे. महानुभावपंथाचा ‘लिळाचरित्र’ नावाचा ग्रंथ तर जवळजवळ हजार पृष्ठांचा आहे. पुर्वीचे ‘ज्ञानेश्वरी’, ‘नामदेव गाथा’, ‘लिळाचरित्र’ अशा वाङमयांनी एकप्रकारे मराठी भाषेला संस्कार दिले.’
‘ज्ञानेश्वरी, नामदेव गाथा, लिळाचरित्र असे पुर्वीचे अनेक ग्रंथ आजही फार उपयुक्त वाङमय आहे. अशा वाङमयानंतरच चरित्र वाङमय, कथा वाङमय, गद्य वाङमय, काव्य असे वाङमयाचे विविध प्रकार देखील निर्माण झाले. मराठी भाषा फार समृद्ध भाषा आहे. या भाषेने वि.स.खांडेकर, वि.दा. करंदीकर, कुसुमाग्रज, भालचंद्र नेमाडे या चार मराठी साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून दिले,’ याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
मराठी भाषेला 2 हजार वर्षाची वाङमयीन परंपरा, इतिहास लाभला आहे. हा इतिहास मराठी भाषा न समजणाऱ्या विद्यार्थ्यांना कसा समजेल आणि त्यांच्यावर या वाङमयाचे संस्कार कसे होतील. इतरही म्हणजे वैद्यकीय, कृषि सारख्या अभ्ययासक्रमात देखील मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे. मराठी आमची मूळ भाषा आहे. सामाजिक आणि व्यावहारिक भाषा देखील झाली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
fake birth certificate case : जन्मदाखल्याच्या प्रकरणात मनसेचा गंभीर आरोप
मराठी ही मुळातच अभिजात भाषा आहे. त्यामुळेच प्राचिन कालखंडात देखील तिचे पुरावे सापडतात. आमच्यासाठी ती आधीच अभिजात होती. केंद्र शासनाने अधिकृत मोहोर लावून भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने माझ्यासारख्या साहित्यिकासह तमाम मराठी मानसाला आनंद झाला आहे. भाषेला अभिजात दर्जा दिल्यानंतर देशाची राजधानी दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे, हा देखील आनंदाचा योग आहे, असे डॅा.कोलते म्हणाले.