Department of Education : अनधिकृत शाळेविरोधात शिक्षण विभागाची कारवाई !

Brilliant English School in Wanadongari closed on the orders of the Child Welfare Committee : बाल कल्याण समितीच्या आदेशावरून वानाडोंगरीतील ब्रिलिएंट इंग्लिश स्कूल बंद

Nagpur : जिल्ह्यात अनधिकृत पद्धतीने सुरू असलेल्या शाळांविरोधात शिक्षण विभागाने घेतलेल्या कडक भूमिकेनंतर आज आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली. हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी परिसरात चालणारी ब्रिलिएंट इंग्लिश स्कूल ही कोणतीही सरकारी मान्यता नसलेली अनधिकृत शाळा जिल्हा बाल कल्याण समितीच्या आदेशाने अखेर बंद करण्यात आली आहे. शिक्षण विभागाने दाखल केलेल्या तक्रारीनंतर ही संयुक्त धडक कारवाई करण्यात आली.

राज्य शिक्षण विभागाकडून अनधिकृत शाळा बंद करण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर नागपूर जिल्ह्यात आधीही अनेक शाळांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र काही शाळा अद्यापही चालू असल्याचे शिक्षण विभागाच्या लक्षात आल्यानंतर विभागाने महिला व बालविकास विभागाकडे तक्रार दाखल केली. प्राथमिक चौकशीत शाळेमध्ये शैक्षणिक क्रियाकलाप सुरू असल्याचे आढळताच ती माहिती जिल्हा बाल कल्याण समितीला देण्यात आली. समितीच्या निर्देशांनुसार तयार झालेल्या संयुक्त तपासणी पथकाने शाळेला प्रत्यक्ष भेट देत विविध नोंदी आणि सुविधांची पाहणी केली.

Pratapgad Festival Committee : पंताजी काका बोकील अधिवक्ता पुरस्कार ॲड. पारिजात पांडे यांना

तपासणी दरम्यान शाळेकडे कोणतीही सरकारी मान्यता, नोंदणी प्रमाणपत्र, युडायस क्रमांक किंवा शाळा चालवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले. इतकेच नव्हे तर शासन निर्देशांनुसार मुलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही यंत्रणा शाळा इमारतीत नसल्याचेही आढळले. भौतिक सुविधा, सुरक्षा निकष आणि शैक्षणिक मानकांमध्ये गंभीर त्रुटी आढळताच बाल कल्याण समितीने स्कूल तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांना शासनमान्य किंवा शासकीय शाळांमध्ये पुनर्वसित करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली.

Municipal Council election : खामगाव–जळगाव जामोद–शेगाव मिळून ८ उमेदवार बाद

कारवाईदरम्यान पथकातील अधिकाऱ्यांनी पालकांशी संवाद साधत मुलांच्या शैक्षणिक, मानसिक आणि शारीरिक सुरक्षेविषयी मार्गदर्शन केले. पालकांनी शाळा निवडताना तिची मान्यता, युडायस क्रमांक आणि शाळेतील सुरक्षा व्यवस्था तपासावी, अशी सूचना त्यांना देण्यात आली. अनधिकृत शाळांमुळे मुलांच्या शैक्षणिक भवितव्याला धोका निर्माण होऊ शकतो, याबाबतही पालकांचे समुपदेशन करण्यात आले.

Devendra Fadnavis : भाजपमध्ये भ्रष्टाचाराला जागा नाही, मुख्यमंत्र्यांचा दावा

ही कारवाई जिल्हा शिक्षणाधिकारी निखिल भुयार आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील मेसरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. संयुक्त पथकामध्ये जिल्हा बाल रक्षक समन्वयक प्रसेंजित गायकवाड, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण, तसेच शाहिना शेख आणि प्रियंका होटे यांचा सक्रिय सहभाग होता.

जिल्ह्यात अनधिकृत शाळांवर कारवाईची ही मोहीम पुढील काही दिवसांत अधिक वेग घेण्याची शक्यता असून शिक्षण विभागाने पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.