Politics flares up in Amravati Market Committee : अनियमितता व गैरव्यवहार प्रकरणी कारवाईला मुभा
Amravati अमरावती बाजार समितीमधील अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी सादर करण्यात आलेल्या चौकशी अहवालावर देण्यात आलेला स्थगनादेश पणन संचालकांनी रद्द केला आहे. तसेच जिल्हा उपनिबंधकांना पुढील कारवाईस मुभा देण्यात आल्याचा आदेश १३ मार्च रोजी जारी करण्यात आला. या निर्णयामुळे बाजार समितीतील राजकीय वातावरण तापले आहे.
शेतकरी संघर्ष समितीचे शेखर औघड, राहुल तायडे आणि उमेश पतींगे यांनी धान्य बाजारातील हायमास्ट पोल, केबलिंग आणि इतर वायरिंग साहित्य खरेदीत शासन निर्णयानुसार प्रक्रिया पाळण्यात आली नाही. उलट आर्थिक अपहार झाल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधकांकडे केली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी उपनिबंधक सहकारी संस्था सचिन पतंगे आणि लेखा परीक्षक सुशील ढोक यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
Amravati Belora Airport : बेलोरा विमानतळाला डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव?
या समितीने २१ जानेवारी २०२५ रोजी चौकशी अहवाल सादर केला. यावर बाजार समितीचे सभापती हरिष मोरे, उपसभापती भैयासाहेब निर्मळ आणि बांधकाम समिती प्रमुख प्रताप भुयार यांनी ३० जानेवारीला पणन संचालकांकडे अपील व स्थगिती अर्ज दाखल केला. या अर्जावर संबंधित पक्षांचे युक्तिवाद झाले.
दरम्यान, शेखर औघड यांनी अपील प्रक्रियेत समाविष्ट होण्यासाठी अर्ज केला होता, मात्र तो विहित स्वरूपात नसल्याने फेटाळण्यात आला. परिणामी, ३ फेब्रुवारीला देण्यात आलेला स्थगनादेश पणन संचालक विकास रसाळ यांनी रद्द करत जिल्हा उपनिबंधकांना पुढील आवश्यक कारवाई करण्याचे आदेश दिले.
Akola-Washim District Central Bank : कर्ज पुनर्गठन घोटाळा पोहोचला विधिमंडळात!
या निर्णयावर प्रतिक्रिया देताना बाजार समितीचे सभापती हरिष मोरे म्हणाले, “पणन संचालकांनी राजकीय दबावाखाली निर्णय घेतला आहे. चौकशी अहवालावर आम्ही योग्यवेळी उचित उत्तर देऊ.” या घडामोडींमुळे बाजार समितीतील राजकारण अधिक तापले असून, पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.