Despite Lok Sabha Defeat, Sudhir Mungantiwar Pushes Ahead with Cultural Bhavan Projects : लोकसभेतील पराभवानंतरही पूर्ण करताहेत सांस्कृतिक भवनांचे काम
यवतमाळ : आमदार सुधीर मुनगंटीवार राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री असताना त्यांनी राज्यभर सांस्कृतिक विकासाची गंगा आणली. त्यांनी केलेल्या विकास कामांची यादी हनुमानाच्या शेपटीसारखी
लांबच लांब होती. आपल्या त्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली होती. दुर्दैवाने त्यात त्यांचा पराभव झाला. पण प्रचारादरम्यान त्यांनी दिलेले वचन तेवढ्याच प्रामाणिकपणे पाळले.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा विस्तार यवतमाळ जिल्ह्यापर्यंत झालेला आहे. प्रचारादरम्यान त्यांनी केळापूर आणि घाटंजी तालुक्यात सांस्कृतिक भवन उभारण्याचे वचन तेथील जनतेला दिले होते. सामान्यपणे नेते प्रचारादरम्याने दिलेली वचने निवडून आल्यानंतरही विसरतात. पण पराभव झाल्यानंतरही दिलेले वचन पाळणारे, पूर्ण करणारे नेते विरळेच. सुधीर मुनगंटीवार असेच एकमेवाद्वितीय नेते आहेत. ज्यांच्यासाठी निवडणुका, जय, पराजय, मंत्रिपदे महत्वाची नाहीत, तर महत्वाची आहे त्यांची लाडकी जनता. जनतेला दिलेला शब्द ते कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करतात. म्हणूनच ‘दिला शब्द ,केला पूर्ण’ हे बिरूद जनतेने त्यांना दिले आहे.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार – फडणवीस भेटीची होणार फलश्रुती !
यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी आणि केळापूर तालुक्यातील पांढरकवडा येथे प्रत्येकी १५ कोटी रुपयांच्या निधीतून भव्य सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार आहे. या बांधकामाचा आढावा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी काल (११ सप्टेंबर) यवतमाळच्या दौऱ्यादरम्यान घेतला. सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालयात बैठकीदरम्यान या सांस्कृतिक भवनांचे डिझाईन, एलिवेशन आणि बांधकामाची प्रगती याबाबत सविस्तर माहिती त्यांनी घेतली. कामाची गती वाढवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देत, २६ सप्टेंबर २०२६ रोजी दोन्ही सांस्कृतिक भवनांचे लोकार्पण व्हावे, असे त्यांनी सांगितले.
Sudhir Mungantiwar : आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानी गणेश प्रतिष्ठापना
निधी मंजुरीपासून अंमलबजावणीपर्यंत देखरेख..
राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री असताना आमदार मुनगंटीवार यांनी या दोन्ही सांस्कृतिक भवनांसाठी प्रत्येकी १५ कोटी निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र, फक्त निधी मंजूर करून थांबणे हे त्यांचे धोरण कधीच नव्हते, आजही नाही. काम प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतरही ते नियमित आढावा घेत आहेत. “जनतेच्या प्रत्येक मागणीची पूर्तता प्रत्यक्ष होते का याची खात्री करून घेणे हेच माझे कर्तव्य आहे”, अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
पराभवानंतरही पूर्ववतच कार्य..
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या घाटंजी आणि केळापूर तालुक्यातील सांस्कृतिक विकासाच्या पुढाकाराने आमदार मुनगंटीवार यांची वेगळी ओळख पुन्हा अधोरेखित झाली आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाला तरी जनतेची कामे करण्याची इच्छा मनात कायम ठेवणारा नेता म्हणजे सुधीरभाऊ मुनगंटीवार, अशी जनमानसात त्यांची प्रतिमा आहे.
Unique Honor : सुधीर मुनगंटीवार यांचा असाही चाहता, दिली अनोखी भेट !
जनतेकडून कौतुकाचा वर्षाव..
या दोन्ही भव्य सांस्कृतिक भवनांमुळे स्थानिक पातळीवर कला, नाटक, शैक्षणिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांना नवे व्यासपीठ मिळणार आहे. “सुधीरभाऊ हे फक्त निधी देणारे नेते नाहीत, तर कामाचा प्रत्यक्ष आढावा घेऊन ते पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करणारे संवेदनशील जननेते आहेत”, अशा शब्दांत स्थानिक ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.








