Deulgao raja municipal complex : देऊळगाव राजात राजकीय वातावरण तापले; शॉपिंग कॉम्प्लेक्सला अजित पवारांचे नाव देण्याची मागणी

civic-issues-protest-ajit-pawar-shopping-complex : हायमास्ट दिवे, भटक्या कुत्र्यांचा वावर आणि स्वच्छतेच्या मुद्द्यावरून नगरसेवक आक्रमक

Deulgao raja शहरातील वाढत्या नागरी समस्यांच्या पार्श्वभूमीवर देऊळगाव राजा नगरपालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रशासकीय राजवट संपून लोकनियुक्त प्रतिनिधी सत्तेत आल्यानंतर शहरवासीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत, मात्र अद्यापही मूलभूत सुविधांसाठी नगरसेवकांना निवेदने द्यावी लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. या पार्श्वभूमीवर, विविध प्रभागांतील प्रलंबित प्रश्नांवरून नगरसेवक आणि गटनेत्यांनी आक्रमक भूमिका घेत नगराध्यक्षा व मुख्याधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.

शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील समस्यांकडे लक्ष वेधताना नगरसेविका दिशा किशोर खांडेभराड यांनी आमना नदी ते पिंपळनेर मार्गावरील काळुकादेवी मंदिरासमोरील बंद पडलेल्या हायमास्ट दिव्यांचा प्रश्न लावून धरला. या मार्गावर रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर अंधार असतो, ज्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि भाविकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अंधारामुळे चोरी आणि अपघाताच्या घटना वाढण्याची शक्यता असल्याने हे दिवे तातडीने सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Akola bar association : अकोला बार असोसिएशन अध्यक्षपदी अॅड. अजय वाघमारे

दुसरीकडे, नगरपालिकेतील विरोधी पक्षाच्या गटनेत्या रंजना अनिल रामाने व इतर नगरसेवकांनी शहरातील भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आणि साचलेल्या कचऱ्यामुळे उद्भवणाऱ्या आरोग्याच्या प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरले. यासोबतच, राज्यातील ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या स्मरणार्थ पालिकेने उभारलेल्या नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्सला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी महत्त्वपूर्ण मागणीही या निवेदनातून करण्यात आली.