Sharad Pawar group’s message through yellow color, Rohit Pawar said : पिवळ्या रंगातून शरद पवार गटाचा संदेश, रोहित पवार म्हणाले…
Mumbai : भाजपकडून राज्यभर राबवण्यात आलेल्या देवाभाऊ कॅम्पेनला शरद पवार गटाने ‘ देवा तूच सांग’ या जाहिरातीद्वारे प्रत्युत्तर दिलं आहे. या जाहिरातीतून शेतकरी कर्जमाफी, आत्महत्या, पीक विमा, कांदा निर्यातबंदी, अतिवृष्टीचं नुकसान, महिलांसाठी योजना आणि युवांना नोकरी यांसारख्या प्रश्नांवर सरकारला थेट आव्हान दिलं आहे.
नाशिकमध्ये उद्या शरद पवार गटाकडून मोर्चा काढण्यात येणार असून त्याआधी आज जिल्ह्यातील विविध दैनिकांमध्ये या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. विशेष म्हणजे या जाहिरातीत पिवळ्या रंगाचा वापर करण्यात आला आहे. अजित पवार गटाने गुलाबी रंग वापरल्यामुळे याला राजकीय उत्तर मानलं जात आहे. मात्र, रोहित पवार यांनी स्पष्ट केलं की, “पिवळा हा सूर्याचा रंग आहे. आम्ही पुन्हा उजळतोय, झेप घेतोय म्हणून हा रंग वापरलाय. गुलाबी रंगाला उत्तर नाही.”
Reservation controversy : धनगर, बंजारांना एसटी आरक्षण दिल्यास राजीनामा देणार !
रोहित पवार यांनी यावेळी भाजप आणि अजित पवार गटावरही हल्लाबोल केला. ते म्हणाले, “राज्यात प्रत्येक ठिकाणी देवाभाऊ जाहिरात लावा असं सांगण्यात आलं होतं, पण कुणाचं नाव छापलं नव्हतं. आमच्या जाहिरातीत आम्ही नाव दिलं आहे. त्यांनी नाव दिलेलं नाही म्हणजे त्यामागे मेघा इंजिनिअरिंग कंपनी आहे का? कारण त्यांचे 190 कोटी माफ झाले आहेत. कोकणात दादांच्या गटातील नेत्याने देवाभाऊ जाहिरात लावली आहे, याचा अर्थ भविष्यात ते भाजपसोबत जाणार आहेत.”
तसेच, महिला व बालकल्याण खात्याच्या योजनांमध्ये आर्थिक व्यवहारात अनियमितता झाल्याचा आरोप करत रोहित पवार म्हणाले की, “लाडक्या बहिणींसाठी पैसे निवडणुकीनंतर दुसऱ्या खात्यातून आणले गेले. सुनील तटकरे यांच्या जवळच्या एजन्सीला साडेतीन कोटी रुपये देण्यात आले. हे चुकीचं आहे, याबाबत आम्ही अधिवेशनात प्रश्न उपस्थित करू.”
Sachin Sawant : आमची जागा आरबीआयला विकण्याचा व्यवहार रद्द करा, काँग्रेसची मागणी
नाशिकमधील शिबिराच्या माध्यमातून शरद पवार गट आगामी महापालिका निवडणुकांसाठी संघटनात्मक तयारी करत आहे. या शिबिरात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह कार्यकर्त्यांना नवचैतन्य देण्याचा प्रयत्न होणार आहे.