Development of tribal areas in Melghat stalled : माजी आमदार राजकुमार पटेल आक्रमक
Amravati देशाच्या स्वातंत्र्यानंतरही मेळघाटातील २२ आदिवासी अतिदुर्गम खेड्यांमध्ये अद्याप वीज पोहोचली नाही. रस्त्यांसारख्या मूलभूत सुविधांच्या अभावामुळे येथील आदिवासींच्या समस्या अधिकच गंभीर झाल्या आहेत. या स्थितीत २१ दिवसांत उपाययोजना न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार राजकुमार पटेल यांनी दिला आहे.
एकीकडे देश आर्थिक महासत्ता होण्याची स्वप्न बघत आहे. आणि दुसरीकडे आदिवासी भागांमध्ये सोयीसुविधांचा अभाव आहे. गडचिरोलीचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. तसाच पुढाकार मेळघाटची स्थिती बदलण्यासाठी ते घेतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Vijay वडेट्टीवार : भाजपमध्ये होतोय शिंदेंच्या शिवसेनेचा ‘उदय’!
मेळघाटातील आदिवासींना आरोग्य, शिक्षण, कृषी, रस्ते आणि वीजपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. माजी आमदारांनी विभागीय आयुक्त अमरावती यांना दिलेल्या निवेदनात काही प्रमुख मागण्या केल्या आहेत. चिखलदरा व धारणी तालुक्यातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि डांबरीकरण प्रलंबित आहे.
केंद्रीय विशेषाधिकार समिती व व्याघ्र प्रकल्प विभागाच्या परवानग्या तत्काळ मिळाव्यात, तसेच, जारिदा सबस्टेशनमधील १२ केव्ही वीजपुरवठ्याचा दर्जा ३३ केव्हीपर्यंत वाढवण्यात आला असला, तरी अद्याप वीजपुरवठा सुरू झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नाही. वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नुकसानभरपाईची रक्कम दुप्पट करण्याची मागणीही पटेल यांनी केली आहे.
Ajit Pawar : महाराष्ट्रातील खेळाडुंनी देशाला मिळवून दिले पहिले खोखो विश्वविजेते पद !
आरोग्य विषयक मूलभूत समस्या
धारणी उपजिल्हा रुग्णालयात डायलेसिस यंत्रे असूनही तंत्रज्ञ नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. आरोग्य व शिक्षण विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची आवश्यकता असल्याचे पटेल यांनी नमूद केले. मग्रारोहयो अंतर्गत मजुरांची थकीत मजुरी अदा करावी आणि कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे निर्माण झालेल्या सिंचनाच्या समस्यांवर त्वरित उपाययोजना करावी, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.