Breaking

Devendra Fadanvis : शेतकऱ्यांच्या जीवनात नवीन उभारी आणणारा प्रकल्प सुरू केलाय !

 

A project has been launched that will bring a new impetus to the lives of farmers : विरोधकांनी केवळ आरोप न करता येथे येऊन बघावे

Nagpur : मिहानमध्ये बाबा रामदेव यांच्या पतंजली उद्योगाला जागा दिली तेव्हापासून विरोधकांची ओरड सुरू होती. कोणत्याही चांगल्या कामात अडवणूक करण्याचेच काम आजवर विरोधकांनी केले. बाबा रामदेव यांनी मिहानमध्ये अतिषय मोठा हर्बल सुरू केला आहे. हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या जीवनात नवी उभारी आणणारा ठरणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आज (९ मार्च) बाबा रामदेव यांच्या नागपूर मेगा फुड पार्कच्या उद्घाटनाच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, शेतकऱ्यांना आता संत्र्याचे उत्पादन वाढवावे लागेल. बाजारात न विकला जाणारा संत्रा या ठिकाणी विकत घेतला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. इतरही फळांची प्रोसेसिंग येथे होणार आहे. कोल्ड स्टोरेज व्यवस्था करण्यात आली आहे. नवीन नर्सरी तयार करून चांगल्या पद्धतीच्या संत्र्याची रोपे तयार करणार आहेत.

CM Devendra Fadnavis : ‘एआय अनझीप्ड’ पुस्तकामुळे कार्यक्षमता वाढेल

नागपूर मिहानमध्ये बाबा रामदेव यांच्या पतंजली उद्योगाला जागा दिली, तेव्हापासूनच विरोधकांनी आरोप सुरू केले होते. आज रामदेवबाबा यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात नवीन उभारी आणणारा प्रकल्प सुरू केला आहे. विरोधकांनी येथे येऊन पाहावे. केवळ विरोधासाठी विरोध म्हणून आरोप करत सूटू नये, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आजवर अनेक अडचणींचा सामना करावा लागत होते. विदर्भात अन्न प्रक्रिया केंद्र नसल्यामुळे हे घडत होते. पण आता तसे होणार नाही. कारण या उद्योगामुळे शेतकऱ्यांच्या जीनवात नवी पहाट आली आहे. याशिवाय गडचिरोली, मेळघाट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हर्बल औषधी आहेत. त्याचाही फायदा होणार आहे.

CM Devendra Fadnavis : विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र Number One!

धावपट्टीचे काम वेगाने होणार..
नागपूर विमानतळावर अत्याधुनिक धावपट्टी उभारण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेऊन प्रयत्न केले होते. यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता, त्यासंदर्भातील सगळ्या प्रक्रिया पार पडल्या आहेत. ते काम केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी गेले आहे. धावपट्टीचे काम लवकरच वेगाने सुरू होईल.

आजचा सामना भारतच जिंकणार..
भारत आणि न्यूझीलॅंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा अतिम सामना आज खेळला जाणार आहे. हा सामना भारतच जिंकणार, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 140 कोटी जनतेचे आशीर्वाद भारतीय संघासोबत आहेत. ज्या पद्धतीने आपला संघ सध्या खेळ करत आहे, त्यावरून आज भारताचीच जिंकण्याची जास्त शक्यता आहे, असेही ते म्हणाले.