Breaking

Devendra Fadanvis : धनंजय मुंडेंच्या पातळीवर मंत्रिमंडळाची चर्चा होत नाही !

Cabinet discussions were not held at the level of Dhananjay Munde but with Ajit Pawar and Eknath Shinde : यापुढे कोणाचीही बेशिस्त वर्तवणूक खपवून घेतली जाणार नाही

Nagpur : मंत्रिमंडळातून डच्चू मिळालेले आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावरून राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले होते. मात्र मंत्रिमंडळात नुकतेच खांदेपालट झाले. त्यानंतर ही चर्चा थांबली. यासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता, तुमची माहिती अर्धवट आहे. धनंजय मुंडे एकदा नव्हे तर तीन वेळा मला भेटले, असे फडणवीस म्हणाले.

मु्ख्यमंत्री फडणवीस यांनी आज (१ ऑगस्ट) नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, धनंजय मुंडेंच्या पातळीवर मंत्रिमंडळाची चर्चा होत नाही, तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत ती चर्चा होत असते. मुंडेंनी वेगवेगळ्या कारणांनी तीन वेळा माझी भेट घेतली आहे. यांपैकी कुठल्याही भेटीमध्ये मंत्रिमंडळाबद्दल चर्चा झाली नाही.

Devendra Fadanvis : सर्व हिंदुंना आतंकवादी ठरवण्यासाठी काँग्रेसचे षडयंत्र होते !

राज्यात, विधान भवनात जी घटना घडली, त्याबाबत मोठा रोष होता. त्यासंदर्भात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आणि सविस्तर चर्चेअंती हा निर्णय घेण्यात आला आहे. माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलण्यात आले आहे. त्यांना दुसरे खाते देण्यात आलेले आहे. आता कृषी खाते मामा भरणे यांना दिले आहे. सध्यातरी मंत्रिमंडळात दुसरा कुठला बदल होईल, असी कुठलीही चर्चा नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Eknath Shinde Sena : शिंदे गटातील शिवसैनिकांचा उद्धवसेनेत प्रवेश

अशा प्रकारची कुठलीही बेशिस्त वर्तवणूक खपवून घेतली जाणार नाही. सर्वांना याबाबत सुचना दिल्या आहेत. अशी वर्तवणूक केल्यास कारवाई केली जाईल. सध्या केलेली कार्यवाही हा सर्वांसाठी संकेत आहे. आम्ही जनतेच्या सेवेसाठी आलेलो आहोत. आपण काय बोलतो, कसं वागतो, आमचा व्यवहार कसा आहे, हे सर्व जनता बारकाईने पाहात असते. त्यामुळे आपल्या वागणुकीवर अंकुश रहायलाच हवा, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.