Chief Minister Devendra Fadnavis donated Rs 5 lakh for the construction of BJP office building : इमारतीच्या बांधकामासाठी दिले पाच लाख रुपये
Nagpur : रामनवमी म्हणून आजचा दिवस मोठा आहेच. आपल्या पक्षाचा स्थापना दिवस आहे, त्यामुळेही हा दिवस महत्वाचा. पण आज पक्षाच्या कार्यालयाचे भूमिपूजन झाले. त्यामुळे हा दिवस आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचा आहे. आपले मार्गदर्शक नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आपण कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन केले. आपल्या घराच्या भूमिपूजनाचा जेवढा आनंद होतो, तेवढाच आनंद आज आपल्या कार्यालयाच्या भूमिपूजनाचा झाला, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नितीन गडकरी यांनी कुदळ मारून उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, श्यामाप्रसाद मुखर्जी, दिनदयाल उपाध्याय आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या मांदियाळीत आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपला पक्ष जगात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. आज आपण आपले मार्गदर्शक नितीन गडकरी यांच्या हस्ते विदर्भाच्या कार्यालयाचे भूमिपूजन केले. नागपूर शहर, नागपूर ग्रामीण आणि विदर्भ, असे एकत्रीतपणे हे कार्यालय असणार आहे.
Mangeshkar Hospital : चौकशी समितीचा दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका !
गेली २५ वर्षे आपण या कार्यालयासाठी प्रयत्न करत आहोत. जमिन विकत घेतली, त्यासाठी कुणालाही अडचणीत आणले नाही. आज प्लॉट आपल्याजवळ आला आहे. सुसज्जीत कार्यालयाचा आराखडा नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे आणि मी मिळून बघितला आहे. ज्यांनी ज्यांनी या कार्यालयासाठी प्रयत्न केले, त्या सर्वांची आठवण आज येथे काढली जात आहे.
कार्यालयासाठी पाच लाख रुपये..
टिळक पुतळा कार्यालयाचा इतिहास नितीनजी गडकरी सांगतील. ज्यांचा आज आपण येथे सत्कार केला, त्या आनंदराव ठवरे यांनी आपल्या सर्वांकरीता, या कार्यालयाकरिता एक लाख रुपये दिले आहेत. हे कार्यालय म्हणजे आपले घर आहे. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने समर्पण दिलं पाहिजे. मी ५ लाख रुपये समर्पण निधी देणार आहे, अशी घोषणा फडणवीस यांनी केली.
Karuna Munde : धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होईल, तोच मोठा विजय !
यावेळी मंचावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महानगर अध्यक्ष बंटी कुकडे, ग्रामीण अध्यक्ष सुधाकर कोहळे. मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके, आनंदराव ठवरे यांच्यासह भाजपचे आजी माजी आमदार, खासदार पक्षाचे परिवारजन उपस्थित होते.