Breaking

Devendra Fadanvis : माधव नेत्रालय मध्य भारतातील मोठी संस्था म्हणून पुढे येणार !

Chief Minister Devendra Fadnavis expressed confidence : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

Nagpur : माधव नेत्रपेढी गेल्या कित्येक वर्षांपासून काम करत आहे. लोकांच्या जिवनात प्रकाश आणण्याचे काम माधव नेत्रालयाने केले. दृष्टी ईश्वराने दिलेली मोठी देण आहे. दृष्टीहिनांना दृष्टी देण्यापेक्षा मोठी सेवा नाही. स्वयंसेवकांनी ३० वर्षांपासून ही सेवा अविरत सुरू ठेवली असल्याचे सांगत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांच्या कार्याच गोरव केला.

नागपुरात आज (३० मार्च) माधव नेत्रालयाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, स्वामी गोविंद गीरी महाराज, स्वामी अवधेशानंद गिरी महाराज, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माधव नेत्रालयाचे महासचिव डॉ. अविनाश चंद्र अग्नीहोत्री होते.

Devendra Fadanvis : दिव्यांगांकरीता काम करणाऱ्या संस्थांच्या अडचणी सोडवणार !

माधव नेत्रालयाच्या कार्याच्या कक्षा रुंदावत आहेत. कामात वाढ होत आहे. आज देशात मोठ्या प्रमाणावर नेत्रसेवेत काम करण्याची गरज आहे. नेत्रदान मोठ्या प्रमाणात होते आहे. अशा संस्था देशात राज्यात अधिक झाल्या पाहिजेत. नागपूर, विदर्भ किंवा महाराष्ट्रासाठीच नाही तर मध्य भारतासाठी माधव नेत्रालय ही संस्था पुढे येणार आहे. या संस्थेने ईश्वराचे कार्य हाती घेतलं आहे. सेवेचे हे कार्य अविरत सुरू राहिल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

CM Devendra Fadnavis : आरोग्य सेवेतील ‘त्या’ 680 पदांची सरळसेवेने भरती

गुढीपाडव्यालाच होणार उद्घाटन !
माधव नेत्रालयाच्या सिटी सेंटरचे उद्घाटन सन १९९५मध्ये झाले. आज नव्या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. ५ लाख वर्ग फूटावर बांधकामाची योजना आहे. यासाठी ५१७ कोटी रुपये खर्च अंदाजित आहे. यामध्ये १४ ओपीडी आणि १४ ऑपरेशन थियेटर्स असणार आहेत. डोळ्यांच्या सर्व रोगांचे परीक्षण आणि उपचार येथे होतील. सर्व सुविधा आणि उपचारांची व्यवस्था असेल. येत्या तीन वर्षांत काम पूर्ण करण्याची योजना आहे. लोकार्पण तीन वर्षांनी २७ मार्च २०२८ ला गुढीपाडव्यालाच करण्याचा संकल्प आहे, अशी माहिती माधव नेत्रालयाचे महासचिव डॉ. अविनाश चंद्र अग्नीहोत्री यांनी यावेळी दिली