Breaking

Devendra Fadanvis : ते रिकामटेकडे आहेत, मी नाही..

Chief Minister Devendra Fadnavis, however, is not responding to Raut’s statements : मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र राऊतांच्या वक्तव्यांवर एकही प्रतिक्रिया देत नाहीत

Nagpur Devendra Fadanvis News : शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळे व्यक्तिमत्व निर्माण केले आहे. कुणी कितीही नाही म्हटले तरी त्यांच्या वक्तव्यांची दखल घेतलीच जाते. भारतीय जनता पक्षाने तर त्यांना उत्तर देण्यासाठी खास नितेश राणे यांची नियुक्ती करून टाकली आहे. तरीही इतर काही नेते त्यांना प्रत्युत्तर देताना दिसतात. पण मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र राऊतांच्या वक्तव्यांवर एकही प्रतिक्रिया देत नाहीत.

मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadanvis) नागपुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एके काळी उद्धव ठाकरे त्यांचे मित्र होते. पण आता राज ठाकरे मित्र आहेत, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. याबद्दल त्यांना विचारले असता, त्यांनी त्यांचे मत व्यक्त केलं, मी माझं मत व्यक्त केलं. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर प्रतिक्रिया द्यायला मी बांधील नाही. ते रिकामटेकडे आहेत, ते रोज बोलतात. मी रिकामटेकडा नाही, असे उत्तर फडणवीसांनी दिले. याशिवाय इतर प्रश्नांना त्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. पण संजय राऊतांबद्दल चकार शब्दही बोलण्यास त्यांनी नकार दिला.

CM DEVENDRA FADNAVIS : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे मेडिकलचे वसतिगृह पडद्यात लपविले !

मुख्यमंत्र्यांनी या दोऱ्यात नागपूर मेडिकल आणि मेयो हॉस्पीटलला भेट दिली. यावेळी ते म्हणाले, नागपूरचे मेयो आणि मेडिकल हे दोन्ही मेडिकल कॉलेजेस जुने आहेत. दोन्ही इमारतींना अनेक दशकं झाली आहेत. त्यामुळे इमारती अद्ययावत करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी एक हजार कोटींचा निधी दिला होता. दोन्ही ठिकाणी कामाची प्रगती पाहण्यासाठी मी आलो होतो.

दोन्ही ठिकाणी कामे सुरू असून ती प्रगतीपथावर आहेत. फक्त कामाची गती वाढवण्याची आवश्यकता आहे. काही त्रुटी आढळल्या आहेत, त्या दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. निधीची कमतरता आम्ही पडू देणार नाही. काम दर्जेदार झाले पाहिजे अशी अपेक्षा आहे. त्या अनुषंगाने आज आढावा घेतला आहे. काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे, गती वाढवण्याची आवश्यकता आहे. एप्रिल महिन्यामध्ये मी पुन्हा आढावा घेणार आहे.

Sarpanch of Siregaonbandh special guest in Delhi : सिरेगावबांधच्या सरपंच दिल्लीत प्रमुख पाहुण्या

महाविकास आघाडी फुटली का, या प्रश्नावर त्यांची आघाडी राहील की तुटेल, याकडे आमचं अजिबात लक्ष नाही. तर महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याकडे आमचे लक्ष आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये कुठलीही कसूर ठेवली जाणार नाही. येत्या पाच वर्षांत महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदललेला दिसेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.