Chief Minister Fadnavis spoke clearly on Nana Patole’s question : नाना पटोलेंच्या प्रश्नावर स्पष्ट बोलले मुख्यमंत्री फडणवीस
Mumbai : मंत्रिमंडळातील एका मंत्र्याचा राजीनामा होतो आणि सभागृहाला त्याची माहिती दिली जात नाही. ही बाब सभागृहाच्या प्रथा, परंपरांना शोभून आहे काय, असा प्रश्न काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी आज (११ मार्च) सभागृहात विचारला. नानांचा रोख थेट मुख्यमंत्र्यांकडे होता. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी ‘हो.. ते आता मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत.’, असे उत्तर दिले.
मुख्यमंत्र्यांच्या उपरोक्त उत्तरानंतरही काही सदस्यांचे समाधान झालेले दिसले नाही. त्यामुळे फडणवीस यांनी ‘धनंजय मुंडे आता मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत’, असे पुन्हा सांगितले. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाब तालिका अध्यक्षांना प्रश्न विचारला होता. सचिव भोळें यांनी तालिका अध्यक्षांना माहिती दिली होती, असे नाना पटोलेंनी सभागृहात सांगितले. त्यावर सचिवांच्या बाबतीत चर्चा करणे अयोग्य आहे. सचिव अध्यक्षांच्या मदतीसाठी आहेत, ते या सभागृहात अदृष्य आहेत, असे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावले.
नियमांचे पुस्तक आपण सर्वच जण वाचतो. येथे हिरव कालीन टाकली आहे, हे नियमात आहे का? सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांसाठी चहापान आयोजित केले जाते, हे नियमात आहे का? अधिवेशन संपल्यावर सत्तापक्षाचे लोक विरोधकांना भेटतात, हेसुद्धा नियमात नाही. पण तरीही हे सर्व घडतं. आपल्या सभागृहाचा गौरव देशपातळीवर होतो, हे आपणच सांगितले. त्यामुळे मंत्र्याच्या राजीनाम्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला देणे गरजेचे नाही का, असा प्रश्न नाना पटोले यांनी केला होता.
CM Fadnavis at Patanjali Food Park : फडणवीस मुख्यमंत्रीपदी नसल्याने फूड पार्क रेंगाळला?
लक्षवेधींच्या बाबतीतही नाना पटोले यांना नाराजी व्यक्त केली. पहिल्या आठवड्यात अध्यक्षांनी शब्द देऊनही आमची नागपूर आणि अकोल्याची लक्षवेधी लावली नाही. सोमवारी लाऊ, असे अध्यक्ष महोदयांनीच सांगितले होते. पण आमच्या लक्षवेधींचा आज कुठेच उल्लेख नाही, अशा शब्दांत नानांनी कालही नाराजी व्यक्त केली होती. अध्यक्षांच्या सुचनेची अंमलबजावणी का झाली नाही, असा प्रश्न पडतो. आपल्या सुचनेचेही पालन होत नसेल तर आमचं रक्षण कोण करणार, असा प्रश्न नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला.
Devendra Fadanvis : शेतकऱ्यांच्या जीवनात नवीन उभारी आणणारा प्रकल्प सुरू केलाय !
कामकाज लक्षवेधीही आहेत, याचा विसर पडू देऊ नये. पहिल्या आठड्यात सत्ताधाऱ्यांचा आणि विरोधी गटाचा आलेला प्रस्ताव आणि इतर कामकाज. आता दुसरा आठवडा सुरू आहे. महत्वाचे कामकाज मागे टाकत गेलो, तर कसे होईल? जी आयुधं सदस्यांना दिली आहेत. त्यावरही आमदारांना चर्चा करू देणार की नाही, असाही सवाल नाना पटोले यांनी केला.