Devendra Fadanvis : आमदार संदीप जोशींना मुख्यमंत्र्यांनी दिले सरप्राईज !

Chief Minister gives surprise to MLC Sandeep Joshi : देवेंद्र फडणवीसांनी अचानक दाखल होऊन दिल्या शुभेच्छा

Nagpur : विधान परिषद सदस्य आमदार संदीप जोशी यांचा काल (२० ऑगस्ट) वाढदिवस होता. सकाळपासूनच त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात शुभेच्छा देण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनसामान्यांची रीघ लागली होती. याशिवाय दिवसभर विविध कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते. दरम्यान आमदार जोशी यांना शुभेच्छा देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात दाखल झाले आणि अचानक संदीप जोशी यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.

आपल्यासाठी हा सुखद धक्का आहे आणि या या शुभेच्छा आपल्यासाठी प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रिया आमदार जोशी यांनी दिली. वाढदिवसानिमित्त शहराच्या विविध भागांतील कार्यकर्त्यांनी समाजोपयोगी कार्यक्रम घेत ‘लोकसेवा दिवस’ म्हणून आमदार जोशींचा वाढदिवस साजरा केला. शहरात दिवसभर सामाजिक, आरोग्य विषयक आणि लोककल्याणकारी उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात हालचालींना प्रचंड वेग !

कार्यक्रमांची सुरवात सकाळी संदीप जोशी यांच्या कार्यालयातून झाली. त्यानंतर बॅटरी ऑपरेटेड गाड्यांचे वितरण करण्यात आले. श्रद्धानंद अनाथ आश्रमात फळवाटप, ज्युपीटर हायस्कूल खामला येथे आरोग्य शिबिर तर अमृत लॉन, मनीष नगर येथे शासकीय योजनांची माहिती देणारी शिबिरं घेण्यात आली. रामेश्वरीतील संत कैकाडी महाराज उद्यानातही आरोग्य शिबिर घेण्यात आले. भगवान नगरमधील धनश्री मंगल कार्यालय परिसरातील बुद्ध विहारात भंतेजींना चिवरदान करण्यात आले.

Raj – Fadnavis Visit : कदाचित ते गणपतीचं आमंत्रण देण्यासाठी गेले असतील !

दुपारनंतर जनसंपर्क कार्यालयात भेटीगाठीचा कार्यक्रम झाला. सायंकाळी तकीया येथील बिरसा मुंडा हॉलमध्ये सुंदरकांड पठण झाले तर लुंबिनीनगर येथील बुद्धविहारात नागरिकांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. भगवती लॉन, त्रिमूर्तीनगर येथे भव्य कार्यक्रम पार पडले. नरेंद्रनगर चौकात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप झाले तर काशीनगर, रामेश्वरी येथे दहीहंडी कार्यक्रमाला आमदार जोशी उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त दिवसभर राबविण्यात आलेले हे उपक्रम आरोग्य, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात लोकसेवेची बांधिलकी अधोरेखित करणारे ठरले.