Chief Minister reveals the journey of Kolhapuri Circuit Bench of Bombay High Court : मुख्यमंत्र्यांनी उलगडला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापुरातील सर्किट बेंचचा प्रवास
Kolhapur : भारताच्या सरन्यायाधीशाच्या मोठ्या स्थानावर बसलेल्या व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापुरातील सर्किट बेंच करण्यासाठी व्यक्तीशः पाठपुरावा केला, ही अतिशय दुर्मीळ बाब आहे. भूषण गवई यांनी दिल्लीत बसून त्यांनी कोल्हापुरातील टीमला ‘डे टू डे’ मार्गदर्शन केले आणि या कामाचा पाठपुरावा केला, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरन्यायाधीशांचा गौरव केला.
कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचा उद्घाटन समारंभ आज (१७ ऑगस्ट) पार पडला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या कामाचा प्रवास उलगडला. ते म्हणाले, आमची वकील मंडळीही सातत्याने पाठपुरावा करत होती. बांधकामाचा विषय होता. परिवर्तीत करायचे होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी हे शिवधनुष्य पेलण्याचे ठरवले. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांनी उत्कूष्ट कार्य केले. त्यांच्या कामामुळे महाराष्ट्र सरकारची मान आज सरन्यायाधीशांपुढे अभिमानाने उंच झाली आहे.
Devendra Fadanvis : सरन्यायाधीश भूषण गवईंनी कोल्हापूरात नवा इतिहास लिहीला !
सरन्यायाधीशांनी ठरवल्यानंतर त्यांनी दुसरं महत्वाचं काम हे केलं की, त्यांनी तारीखही ठरवून टाकली १६ किंवा १७ ऑगस्ट ही तारीख त्यांनी ठरवली. रिव्हर्स वर्कींग सुरू करण्यास संगितले. मुख्य न्यायाधीश आराध्ये आणि आम्हीही त्यावर विचार केला. म्हणूनच संग्राम देसाईंनी जे सांगितलं की, त्यांनी मागणी केली होती. त्यावर मी काहीच बोललो नाही. पण त्यांच्या कानात सांगितलं की, हे काम लवकरच होणार आहे. पण जाहीर करू नका. कारण लवकर घोषणा केली की, कुठेतरी माशी शिंगते. आपण थेट बेंचच निर्माण करू, असे त्यांना सांगितल्याचे फडणवीस म्हणाले.
सरन्यायाधीशांनी शेड्यूल फायनल केले. ते म्हणाले आधीच जागा बघून ठेवा, त्यानंतर ही जागा परिवर्तीत होऊ शकते, हे लक्षात घेतल्यानंतर मुख्य न्यायमूर्ती महोदयांनी पत्र लिहिलं. गवई साहेबांचा फोन आला की, लवकर उत्तर द्या. तुम्ही वेळ लावला तर आपली समारंभाची तारीख चुकेल. त्यानंतर मी राज्यपालांना हे सर्व सांगितलं. सकाळी पत्र आलं अन् सायंकाळी राज्यपालांनी पत्र पाठवलं की आमचं शासन करायला तयार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
Raut Vs Fadnavis : मुंबई लुटणारे तुमच्याच सरकारमध्ये, जनता माफ करणार नाही !
२०१८ साली चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ मला भेटायला आले होते. एन. डी. पाटील. छत्रपती शाहू महाराज, क्षिरसागर हे सर्व त्या शिष्टमंडळात होते. ते म्हणाले पुन्हा एकदा हायकोर्टाला विनंती करा, आम्ही पाठपुरावा करत आहोत. यापूर्वी जो ठराव पाठवला. त्यामध्ये ‘कोल्हापूरला सर्कीट बेंट करावा आणि पुण्याचाही विचार करावा’, असं म्हटलं होते. पण आका फक्त कोल्हापूरचा उल्लेख असलेले पत्र द्यावे. कोल्हापूरमध्ये बेंच करावे असं पत्र आम्ही १८ फेब्रुवारी २०१८ ला लीहिलं.
त्या पत्रावर उच्च न्यायालयाकडून विचारणा झाली. आम्ही विचार केला तर तुमची इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायला तयारी आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. १९ जानेवाबी २०१९ ला पुन्हा प्रस्ताव पाठवला. ही जागा आणि १०० कोटी रुपये देणार, अशी घोषणा केली. हा प्रस्ताव उच्च न्यायालयाकडे पाठवला. या सगळ्या गोष्टी होत होत्या तरी सर्कीट बेंचचा थांगपत्ता लागत नव्हता. तेव्हा सरन्यायाधीश भूषण गवई यांनी पुढाकार घेतला. त्यांनी ठरवलं नंतर आमच्याशी चर्चा केली. ते म्हणाले, कोल्हापूरची मागणी योग्य आहे. ईतक्या दुरून मुंबईला जाणे लोकांसाठी अवघड आहे. कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोकणातील लोक मुंबईला जातात. त्यामुळे अधिकार कोल्हापूरचा आहे. त्यांनी जाहिर भूमिका घेतली की असा बेंच झाला पाहिजे. आमचंही तेच मत असल्याचं आम्ही सांगितलं आणि येवढ्या प्रवासानंतर आजचा दिवस उजाडला, असे फडणवीस यांनी सांगितले.
Maharashtra politics : महायुती सरकारला मित्रपक्षांच्या वादग्रस्त नेत्यांचा फटका
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आज एक शब्द अजून देतो की जमीन हस्तांतरीत केली आहे. येवढ्यावर थांबणार नाही तर लवकरात लवकर आराखडा तयार करून सरन्यायाधीश आम्हाला देतील, तेवढ्या लवकर बांधकाम सुरू करू. सुंदर इमारत उभी करू. केवळ उच्च न्यायालयाचं सर्कीट बेंच आलं नाही. तर कोल्हापूरच्या सर्वांगिण विकासाचं दालन उघडलं आहे. आजुबाजुचे जिल्हे पुणे विभागातील काही जिल्हे आणि कोकणातील दोन जिल्ह्यांचे केंद्र कोल्हापूर झाले आहे.