Congress’ conspiracy to label all Hindus as terrorists : हिंदू आतंकवाद शब्द निर्माण करून अनेकांना अटक केली गेली
Nagpur : सन २०००च्या सुरुवातीच्या काळात संपूर्ण विश्वात मोठ्या प्रमाणावर दहशतवादी घटना घडल्या. अनेक घटनांचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे इस्लामिक दहशतवाद असा नरेटीव जगभर निर्माण झाला होता. तो भारताने केलेला नव्हता. मात्र या नरेटीवचा आपल्या व्होट बॅंकेवर परिणाम होत आहे, हे काँग्रेसच्या लक्षात आलं. दरम्यान मालेगावच्या घटनेनंतर काँग्रेस पक्षाने हिंदू आतंकवाद किंवा भगवा आतंकवाद, असा नरेटिव तयार केला होता, तो आता पूर्णबणे बस्ट झाला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
नागपुरात आज (१ ऑगस्ट) पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. सर्व मुसलमानांना आतंकवादी ठरवलं गेलं नव्हतं. तरीदेखील सर्व हिंदूंना आतंकवादी ठरवण्याकरिता काँग्रेस पक्षाने हे षडयंत्र रचलं होतं. यूपीएने हे षडयंत्र रचलं आणि हिंदू आतंकवाद असा शब्द निर्माण करून अनेकांना अटक केली गेली. जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू करून एका यंत्रणेवर दबाव आणून हिंदुत्ववादी संघटना खास करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी किंवा विचार परिवारातील अन्य संघटनांचे पदाधिकारी हे कसे भगवा आतंकवादामध्ये शामील आहे, अशा पद्धतीचे षडयंत्र तयार करण्याचा प्रयत्न झाला.
Maharashtra politics : मंत्रिमंडळाची चर्चा धनंजय मुंडेंच्या स्तरावर होत नाही
काँग्रेसने पसरवलेल्या नरेटिवचे कुठलेही पुरावे मिळाले नाहीत. त्यानंतर पुराव्याअभावीसुद्धा कारवाई करा, असा दबाव पोलीस यंत्रणेवर होता. पोलीस यंत्रणेतील अनेक अधिकारी त्या दबावाला बळी पडले नाहीत. त्यामुळे पुढची कारवाई होऊ शकली नाही. अन्यथा हे खूप खोल रूतलेले षड्यंत्र होते. आता त्याचा परदाफाश झाला आहे. हळूहळू यातील सर्व घटना बाहेर येतील आणि त्या वेळच्या भारतातील आणि राज्यातील सरकारने हिंदूंना दहशतवादी ठरवून हिंदू संघटनांना संपवण्याकरता, त्यांच्यावर बंदी घालण्याकरिता एक प्रयत्न उभा केला होता, हेच त्याच्यातून समोर आलं आहे.








